Join us

सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; माझगाव डॉकच्या शेअर्समध्ये तेजी, वेदांता घसरला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 9:52 AM

चालू आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी शेअर बाजाराचं कामकाज सामान्य नोटवर सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स ५० अंकांनी घसरून ७८००३ अंकांवर तर निफ्टी २५ अंकांनी घसरून २३६९६ अंकांवर उघडला.

चालू आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी शेअर बाजाराचं कामकाज सामान्य नोटवर सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स ५० अंकांनी घसरून ७८००३ अंकांवर तर निफ्टी २५ अंकांनी घसरून २३६९६ अंकांवर उघडला. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात माझगाव डॉक, गार्डन रीच, मणप्पुरम फायनान्स, भारत डायनॅमिक्स, पीएनबी हाऊसिंग आणि अमारा राजा बॅटरीज यांच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली, तर क्राफ्ट्समन ऑटोमेशन, मॅक्स हेल्थ केअर, सीई इन्फो सिस्टिम्स, वेदांता, महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल, फाइव्ह स्टार बिझनेस आणि अॅस्ट्राझेनेकाच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

मल्टिबॅगर शेअर्सची स्थिती

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, लार्सन, कोटक महिंद्रा बँक, विप्रो, एशियन पेंट्स यांचे शेअर्स किरकोळ वधारले, तर एचसीएल टेक, इन्फोसिस, पॉवर ग्रिड, ओएनजीसी, अशोक लेलँड, जेके पेपर आणि टॅक्स मेको रेल यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. कोचीन शिपयार्ड, बीईएमएल, टीटागड रेल्वे, बीईएल, ग्रेट ईस्टर्न शिपिंग, एनटीपीसी, वेस्ट कोस्ट पेपर, एसजेव्हीएन, भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि एनएचपीसी या कंपन्यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले.

तर रेलटेल, आयआरसीटीसी, हिंदुस्थान पेट्रोलियम, इरकॉन, पॉवर ग्रिड, कोल इंडिया, रेल विकास निगम, एचएएल, राइट्स लिमिटेड, कंटेनर कॉर्पोरेशन, गेल इंडिया आणि एनएमडीसी या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण नोंदविण्यात आली. बुधवारच्या सुरुवातीच्या व्यवहारात गौतम अदानी समूहाच्या सर्व १० लिस्टेड कंपन्यांचे शेअर्स ग्रीन झोनमध्ये व्यवहार करत होते. अदानी टोटल गॅस दोन टक्क्यांनी वधारला तर अदानी पॉवर किरकोळ वाढीसह कार्यरत होता.

प्री ओपन मार्केटची स्थिती

बुधवारी प्री ओपन मार्केटमध्ये सेन्सेक्स ६४ अंकांच्या घसरणीसह ७७९८९ अंकांवर तर निफ्टी १४० अंकांनी घसरून २३५८१ अंकांवर व्यवहार करत होता. शेअर बाजाराचे कामकाज सुरळीत सुरू होऊ शकते, असे संकेत गिफ्ट निफ्टीकडून मिळत होते. आशियाई शेअर बाजारात बुधवारी सुरुवातीच्या कामकाजात घसरण दिसून आला.

टॅग्स :शेअर बाजार