Join us  

घसरणीनंतर सेन्सेक्स-निफ्टी सावरला; टाटा मोटर्समध्ये तेजी, हीरो मोटोकॉर्प घसरला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 4:32 PM

शेअर बाजाराच्या कामकाजादरम्यान अनेक चढ-उतार दिसून आले आणि सुरुवातीच्या घसरणीनंतर त्यात चांगली रिकव्हरी झाली.

 शेअर बाजारातील कामकाज मंगळवारी वाढीसह बंद झालं. बीएसई सेन्सेक्स 305 अंकांच्या वाढीसह 73095 अंकांवर तर निफ्टी 76 अंकांच्या वाढीसह 22198 अंकांवर बंद झाला. शेअर बाजाराच्या कामकाजादरम्यान अनेक चढ-उतार दिसून आले आणि सुरुवातीच्या घसरणीनंतर त्यात चांगली रिकव्हरी झाली. 

मंगळवारी निफ्टी रियल्टी इंडेक्समध्ये जोरदार तेजी दिसून आली. कामकाजादरम्यान व्होडाफोन आयडियाच्या शेअर्समध्ये तीन टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली, तर देवयानी इंटरनॅशनलचे शेअर्स 6 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले. 

सुरुवातीच्या घसरणीनंतर शेअर बाजारात चांगली वाढ नोंदवली गेली. निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांक किरकोळ वाढीसह बंद झाले तर, बीएसई स्मॉल कॅप आणि निफ्टी मिडकॅप 100 मध्ये घसरण दिसून आली. मंगळवारी टाटा मोटर्सचे शेअर्स तीन टक्क्यांनी वधारले तर टीसीएस, इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्येही वाढ झाली. 

कामकाजादरम्यान हीरो मोटोकॉर्प, बजाज फायनान्स, एसबीआय, दिवीज लॅब, बजाज फिनसर्व्ह आणि अदानी एन्टरप्राईझेसच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. टाटा मोटर्स, पॉवर ग्रिड, सन फार्मा, सिप्ला, महिंद्रा, रिलायन्स आणि एसबीआय लाईफ यांचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले. तर ब्रिटानिया, टाटा मोटर्स, ओएनजीसी, एचडीएफसी लाईफ, पॉवर ग्रिड, एसबीआय लाईफ आणि सन फार्मा व्हॉल्यूमच्या बाबतीत सर्वाधिक ट्रेड होणारे शेअर्स ठरले.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजार