Share Market Closing: शेअर बाजार मंगळवारी 11 जुलै रोजी सलग दुसऱ्या दिवशी मोठ्या तेजीसह बंद झाला. सेन्सेक्समध्ये 273 अंकांनी उसळी पाहायला मिळाली. तर निफ्टी 19,450 च्या जवळ पोहोचला. ब्रॉडर मार्केटमध्येही तेजीचा कल होता. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे 0.9780 टक्के आणि 0.80 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.
मेटल आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे निर्देशांक वगळता इतर सर्व सेक्टर्सच्या निर्देशांकात वाढ दिसून आली. यापैकी ऑटो, पॉवर, एफएमसीजी, कॅपिटल गुड्स आणि फार्मा समभागांच्या निर्देशांकात प्रत्येकी 1 टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली. त्यामुळे शेअर बाजारातीलगुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज सुमारे दोन लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
कामकाजाच्या अखेरच्या सत्रात मुंबई शेअर बाजारातील (BSE) 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 273.67 अंकांनी किंवा 0.42 टक्क्यांनी वाढून 65,617.84 वर बंद झाला. दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा (NSE) 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 83.50 अंकांच्या किंवा 0.43 टक्क्यांच्या वाढीसह 19,439.40 च्या पातळीवर बंद झाला.
गुंतवणूकदारांनी कमावले 2 लाख कोटीबीएसईवरील लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 301.39 लाख कोटी झाले आहे, जे त्यांच्या मागील ट्रेडिंग दिवशी म्हणजे सोमवारी 299.41 लाख कोटी रुपये होते. बीएसईमध्ये लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप आज सुमारे 1.98 लाख कोटी रुपयांनी वाढलं. दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1.98 लाख कोटी रुपयांची वाढ झाली.