Join us

Share Market Today : Sensex-Niftyची विक्रमी भरारी; केवळ 'या' क्षेत्रात विक्री, गुंतवणूकदारांनी कमावले ₹१.७५ लाख कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 9:44 AM

Share Market Opening Bell: जागतिक बाजारातून जोरदार संकेत मिळत असताना देशांतर्गत बाजारातही चांगली तेजी दिसत आहे. देशांतर्गत शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये उसळी दिसून येत आहे.

Stock Market Opening Bell: जागतिक बाजारातून जोरदार संकेत मिळत असताना देशांतर्गत बाजारातही चांगली तेजी दिसत आहे. देशांतर्गत शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये उसळी दिसून येत आहे. गुरुवारी सेन्सेक्सनं प्रथमच ८२ हजारांचा टप्पा ओलांडला होता आणि निफ्टी २५१५० च्या वर बंद झाला होता. त्याची विक्रमी तेजी आजही कायम आहे. आयटी वगळता निफ्टी क्षेत्रातील सर्व निर्देशांक ग्रीन झोनमध्ये. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही खरेदीचा कल आहे. एकंदरीत बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप १.७५ लाख कोटी रुपयांनी वाढलंय, म्हणजेच बाजार उघडताच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १.७५ लाख कोटी रुपयांची वाढ झाली.

आता इक्विटी बेंचमार्क निर्देशांकांबद्दल बोलायचे झाले तर बीएसई सेन्सेक्स ३२२.१७ अंकांनी म्हणजेच ०.७४ टक्क्यांनी वधारून ८२,४५६.७८ वर आणि निफ्टी ५० ९०.२० अंकांनी म्हणजे ०.३९ टक्क्यांनी वधारून २५,२४२.१५ वर ट्रेड करत होता. गुरुवारी सेन्सेक्स ८२,१३४.६१ वर आणि निफ्टी २५,१५१.९५ वर बंद झाला होता.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १.७५ लाख कोटींची वाढ

एका दिवसापूर्वी म्हणजेच २९ ऑगस्ट रोजी बीएसईवर लिस्टेड सर्व शेअर्सचं एकूण मार्केट कॅप ४,६२,५६,०७९.१२ कोटी रुपये होतं. आज ३० ऑगस्ट रोजी बाजार उघडताच ते ४,६४,३१,३४८.६९ कोटी रुपयांवर पोहोचलं. म्हणजेच गुंतवणूकदारांच्या भांडवलात १,७५,२६९.५७ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सेन्सेक्सचे २५ शेअर्स ग्रीन झोनमध्ये

सेन्सेक्समध्ये ३० शेअर्स लिस्टेड असून त्यापैकी २५ शेअर्स ग्रीन झोनमध्ये आहेत. बजाज फायनान्स, एल अँड टी आणि बजाज फिनसर्व्हमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. दुसरीकडे टाटा मोटर्स, टीसीएस आणि टेक महिंद्राचे शेअर्स सर्वाधिक घसरले. एचडीएफसी, एनटीपीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, रिलायन्स, पॉवरग्रीड, अदानी पोर्ट्स, एशियन पेंट्स, महिंद्रा, एसबीआय बँक, टाटा स्टील यांच्याही शेअरमध्ये तेजी दिसून आली.

टॅग्स :शेअर बाजार