Stock market closing bell Today: सकाळच्या तेजीनंतर शेअर बाजारातील कामकाज मंगळवारी घसरणीसह बंद झालं. मंगळवारी बीएसई सेन्सेक्स 58 अंकांच्या घसरणीसह 74683 अंकांच्या पातळीवर बंद झाला. तर निफ्टी 23 अंकांच्या घसरणीसह 22642 अंकांच्या पातळीवर बंद झाला. शेअर बाजारातील व्यवहाराला मंगळवारी चांगली सुरुवात झाली. कामकाजाच्या अखेरिस प्रॉफिट बुकिंगमुळे शेअर बाजारात घसरण दिसून आली.
शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांबद्दल बोलायचं झाल्यास, भारत इलेक्ट्रॉनिक्स, इन्फोसिस, ॲक्सिस बँक आणि एचसीएल टेकच्या शेअर्समध्ये वाढ झाली. तर कोटक महिंद्रा बँक, ओएनजीसी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, विप्रो लिमिटेड आणि एशियन पेंट्सच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
मंगळवारी कामकाजाला जोरदार सुरुवात केल्यानंतर अखेर शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. शेअर बाजारात, निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा आणि निफ्टी एफएमसीजी निर्देशांकात घसरण नोंदवली गेली. मंगळवारच्या व्यवहारात निफ्टी आयटी, निफ्टी बँक आणि निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेसमध्ये वाढ दिसून आली.
या शेअर्समध्ये तेजी / घसरण
मंगळवारी शेअर बाजारातील टॉप गेनर्सबद्दल बोलायचे तर, अपोलो हॉस्पिटल, हिंदाल्को, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, आयशर मोटर्स, बजाज फिनसर्व्ह आणि ग्रासिम इंडस्ट्रीजच्या शेअर्सनं वाढ नोंदवली. तर टायटन, हीरो मोटोकॉर्प, कोल इंडिया, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, एशियन वीकनेस. पेंट्स, बीपीसीएल आणि टाटा कंझ्युमरच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.