Sensex-Nifty opens flat: जागतिक बाजारातून संमिश्र संकेत मिळत असताना देशांतर्गत बाजारात घसरण दिसून येत आहे. देशांतर्गत इक्विटी बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी जवळजवळ फ्लॅट ओपन झाले. निफ्टीच्या सर्वच क्षेत्रांच्या निर्देशांकात किंचित चढ-उतार दिसून येत आहेत. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही संमिश्र कल दिसून येत आहे. एकंदरीत बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप अडीच हजार कोटी रुपयांनी कमी झालंय, म्हणजेच बाजार उघडताच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत अडीच हजार कोटी रुपयांची घट झाली आहे.
आता इक्विटी बेंचमार्क निर्देशांकांबद्दल बोलायचं झालं तर बीएसई सेन्सेक्स ७४.७९ अंकांनी म्हणजेच ०.०९ टक्क्यांनी घसरून ८१,७१०.७७ वर आणि निफ्टी ५० ३२.३० अंकांनी म्हणजेच ०.१३ टक्क्यांनी घसरून २५,०२०.०५ वर ट्रेड करत होता. बुधवारी सेन्सेक्स ८१,७८५.५६ वर आणि निफ्टी २५,०५२.३५ वर बंद झाला होता.
संपत्तीत अडीच हजार कोटींची घट
एक दिवसापूर्वी म्हणजेच २८ ऑगस्ट रोजी बीएसईवर लिस्टेड सर्व शेअर्सचं एकूण मार्केट कॅप ४,६३,०३,३५५.१३ कोटी रुपये होते. आज २९ ऑगस्ट रोजी बाजार उघडताच ते ४,६३,००,८४७ कोटी रुपयांवर आलं. म्हणजेच गुंतवणूकदारांच्या भांडवलात २,५०८.१३ कोटी रुपयांची घट झाली आहे.
सेन्सेक्सचे ११ शेअर ग्रीन झोनमध्ये
सेन्सेक्समध्ये ३० शेअर्स लिस्टेड असून त्यापैकी ११ शेअर ग्रीन झोनमध्ये आहेत. एअरटेल, बजाज फिनसर्व्ह आणि टेक महिंद्रामध्ये सर्वाधिक वाढ झाली. तर दुसरीकडे, अल्ट्राटेक, महिंद्रा अँड महिंद्रा आणि एचसीएलचे शेअर्स सर्वाधिक घसरले. दरम्यान, टेक महिंद्रा, आयटीसी, एल अँड टी, टाटा मोटर्स, रिलायन्स, अदानी पोर्ट्स, टायटन, कोटक महिंद्रा बँक, बजाज फायनान्सच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.