Lokmat Money >शेअर बाजार > Sensex-Nifty ची फ्लॅट सुरुवात; 'या' शेअर्सच्या जोरावर गुंतवणूकदारांनी कमावले ₹७२.९ हजार कोटी

Sensex-Nifty ची फ्लॅट सुरुवात; 'या' शेअर्सच्या जोरावर गुंतवणूकदारांनी कमावले ₹७२.९ हजार कोटी

Sensex-Nifty flat opening: जागतिक बाजारातून संमिश्र संकेत मिळत असताना देशांतर्गत बाजारात किंचित तेजी दिसून येत आहे. देशांतर्गत शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये किंचित वाढ झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 09:45 AM2024-08-23T09:45:55+5:302024-08-23T09:46:10+5:30

Sensex-Nifty flat opening: जागतिक बाजारातून संमिश्र संकेत मिळत असताना देशांतर्गत बाजारात किंचित तेजी दिसून येत आहे. देशांतर्गत शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये किंचित वाढ झाली आहे.

Sensex Nifty starts flat Investors earned rs 72 9 thousand crores on the strength of these shares | Sensex-Nifty ची फ्लॅट सुरुवात; 'या' शेअर्सच्या जोरावर गुंतवणूकदारांनी कमावले ₹७२.९ हजार कोटी

Sensex-Nifty ची फ्लॅट सुरुवात; 'या' शेअर्सच्या जोरावर गुंतवणूकदारांनी कमावले ₹७२.९ हजार कोटी

Sensex-Nifty flat opening: जागतिक बाजारातून संमिश्र संकेत मिळत असताना देशांतर्गत बाजारात किंचित तेजी दिसून येत आहे. देशांतर्गत शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये किंचित वाढ झाली आहे. बँकिंग, आयटी आणि रियल्टी वगळता इतर क्षेत्रात खरेदीचं वातावरण आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही खरेदीचा कल आहे. एकंदरीत बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप ७२.९ हजार कोटी रुपयांनी वाढलं आहे, म्हणजेच बाजार उघडताच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ७२.९ हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

आता इक्विटी बेंचमार्क निर्देशांकांबद्दल बोलायचं झालं तर बीएसई सेन्सेक्स सध्या ५१.७८ अंकांनी वाढून ८१,१०४.९७ वर आणि निफ्टी ५० १५.२५ अंकांनी वाढून २४,८२६.७५ वर आहे. गुरुवारी सेन्सेक्स ८१,०५३.१९ वर आणि निफ्टी २४,८११.५० वर बंद झाला होता.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ७२.९ हजार कोटींची वाढ

एक दिवसापूर्वी म्हणजे २२ ऑगस्ट २०२४ रोजी बीएसईवर लिस्टेड सर्व शेअर्सचं एकूण मार्केट कॅप ४,६०,५२,४६२.९७ कोटी रुपये होते. आज २३ ऑगस्ट २०२४ रोजी बाजार उघडताच ते ४,६१,२५,३७७.३६ कोटी रुपयांवर पोहोचलं. म्हणजेच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ७२,९१४.३९ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सेन्सेक्सचे १३ शेअर्स ग्रीन झोनमध्ये

सेन्सेक्समध्ये ३० शेअर्स लिस्टेड असून त्यापैकी १३ शेअर्स ग्रीन झोनमध्ये आहेत. टाटा मोटर्स, रिलायन्स आणि अदानी पोर्ट्स या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. दुसरीकडे, एनटीपीसी, एचडीएफसी बँक आणि इन्फोसिसचे शेअर्स सर्वाधिक घसरले. एचसीएल टेक, सनफार्मा, हिंदुस्तान युनिलिव्हर, भारती एअरटेल, पॉवरग्रीड, महिंद्रा अँड महिंद्रा, एसबीआय बँक, जेएसडब्ल्यू स्टील, बजाज फिनसर्व्ह, टायटन या कंपन्यांच्या शेअर्समध्येदेखील तेजी दिसून आली.

Web Title: Sensex Nifty starts flat Investors earned rs 72 9 thousand crores on the strength of these shares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.