Join us

Sensex-Niftyची फ्लॅट सुरुवात; बुल-बेअर यांच्या रस्सीखेचीत गुंतवणूकदारांचे बुडाले ₹१२१.६१ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 9:49 AM

Sensex-Nifty Flat Starts: जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांमुळे देशांतर्गत बाजारातही विक्रीचा दबाव दिसून येत आहे. देशांतर्गत इक्विटी बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी किरकोळ घसरले.

Sensex-Nifty Flat Starts: जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांमुळे देशांतर्गत बाजारातही विक्रीचा दबाव दिसून येत आहे. देशांतर्गत इक्विटी बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी किरकोळ घसरले. तर निफ्टी सेक्टरमध्ये संमिश्र ट्रेंड आहे. मिडकॅपमध्ये किंचित विक्री होत असून स्मॉलकॅप शेअर्समध्ये खरेदीचा कल दिसून येत आहे. एकंदरीत बुल-बेअरच्या या रस्सीखेचीत बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप केवळ १२१.६१ कोटी रुपयांनी कमी झालं आहे, म्हणजेच बाजार उघडताच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १२१.६१ कोटी रुपयांची घट झाली आहे.

आता इक्विटी बेंचमार्क निर्देशांकांबद्दल बोलायचं झालं तर बीएसई सेन्सेक्स सध्या ६६.३३ अंकांनी म्हणजे ०.०८ टक्क्यांनी घसरून ८०७३६.५३ वर आणि निफ्टी ५० २६.४५ अंकांनी म्हणजे ०.११ टक्क्यांनी घसरून २४६७२.४० वर आलाय. मंगळवारी सेन्सेक्स ८०,८०२.८६ वर आणि निफ्टी २४,६९८.८५ वर बंद झाला होता.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १२१.६१ कोटींची घट

एक दिवसापूर्वी म्हणजे २० ऑगस्ट २०२४ रोजी बीएसईवरील सर्व लिस्टेड शेअर्सचं एकूण मार्केट कॅप ४,५६,८६,०९९.३५ कोटी रुपये होतं. आज २१ ऑगस्ट २०२४ रोजी बाजार उघडताच ते ४,५६,८५,९७७.७४ कोटी रुपयांवर पोहोचलं. म्हणजेच गुंतवणूकदारांच्या भांडवलात १२१.६१ कोटी रुपयांची घट झाली आहे.

सेन्सेक्सचे १४ शेअर ग्रीन झोनमध्ये

सेन्सेक्समध्ये ३० शेअर्स लिस्टेड असून त्यापैकी १४ शेअर्स ग्रीन झोनमध्ये आहेत. एअरटेल, एल अँड टी आणि टाटा मोटर्समध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. तर दुसरीकडे अल्ट्राटेक, टेक महिंद्रा आणि जेएसडब्ल्यू स्टीलचे शेअर्स सर्वाधिक घसरले. नेस्ले, बजाज फिनसर्व्ह, अदानी पोर्ट्स, एनटीपीसी, आयटीसी, कोटक बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, सनफार्मा, महिंद्रा अँड महिंद्रा, टायटन आणि इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.

टॅग्स :शेअर बाजार