Join us

Stock Market Opening Today: सेन्सेक्स-निफ्टीची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, गुंतवणूकदारांनी कमावले ₹१.३९ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 9:50 AM

Stock Market Opening Today: बहुतांश बाजारांतून सकारात्मक संकेत मिळत असताना देशांतर्गत बाजारातही थोडी तेजी दिसत आहे. देशांतर्गत शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी बुधवारी तेजीसह उघडले.

Sensex-Nifty Green Starts: बहुतांश बाजारांतून सकारात्मक संकेत मिळत असताना देशांतर्गत बाजारातही थोडी तेजी दिसत आहे. देशांतर्गत शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी बुधवारी तेजीसह उघडले. निफ्टीचे सर्व निर्देशांक ग्रीन झोनमध्ये होते. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही खरेदीचा कल दिसून आला. एकंदरीत बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप १.३९ लाख कोटी रुपयांनी वाढलं आहे, म्हणजेच बाजार उघडताच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १.३९ लाख कोटी रुपयांची वाढ झाली.

आता इक्विटी बेंचमार्क निर्देशांकांबद्दल बोलायचं झालं तर बीएसई सेन्सेक्स ८८.९७ अंकांनी म्हणजेच ०.११ टक्क्यांनी वधारून ८१,५४४.३७ वर आणि निफ्टी ५० हा २९.८० अंकांनी म्हणजे ०.१२ टक्क्यांनी वधारून २४,८८७.१० वर होता. यापूर्वी मंगळवारी सेन्सेक्स ८१,४५५.४० वर आणि निफ्टी २४,८५७.३० वर बंद झाला होता.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १.३९ लाख कोटींची वाढ

एका दिवसापूर्वी म्हणजेच ३० जुलै २०२४ रोजी बीएसईवर लिस्टेड सर्व शेअर्सचं एकूण मार्केट कॅप ४,६०,९१,४४५.३४ कोटी रुपये होतं. आज ३१ जुलै २०२४ रोजी बाजार उघडताच ते ४,६२,३१,२४५.३९ कोटी रुपयांवर पोहोचले. म्हणजेच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १,३९,८००.०५ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सेन्सेक्सचे २१ शेअर ग्रीन झोनमध्ये

सेन्सेक्समध्ये ३० शेअर्स लिस्टेड असून त्यापैकी २१ शेअर ग्रीन झोनमध्ये आहेत. एनटीपीसी, मारुती आणि आयसीआयसीआय बँक यांचे यांच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर दुसरीकडे अॅक्सिस बँक, पॉवरग्रिड आणि इंडसइंड बँकेचे शेअर्स सर्वाधिक घसरले. तर दुसरीकडे अदानी पोर्ट्स, टायटन, महिंद्रा अँड महिंद्रा, एअरटेल, टाटा स्टील, सनफार्मा, जेएसडब्ल्यू स्टीस, टीसीएस, एचडीएफसी यांच्या शेअर्समध्येही तेजी दिसून आली.

टॅग्स :शेअर बाजार