Join us  

Sensex-Nifty ची तेजीसह सुरुवात; फर्टिलायझर शेअर्समध्ये तेजी, वेबको इंडिया आपटला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 9:54 AM

शेअर बाजारात बुधवारी तेजीसह कामकाजला सुरुवात झाली. बीएसई सेन्सेक्स ११७ अंकांच्या मजबुतीसह ७७४१८ अंकांवर उघडला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी २१ अंकांच्या मजबुतीसह २३५७९ अंकांवर उघडला.

शेअर बाजारात बुधवारी तेजीसह कामकाजला सुरुवात झाली. बीएसई सेन्सेक्स ११७ अंकांच्या मजबुतीसह ७७४१८ अंकांवर उघडला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी २१ अंकांच्या मजबुतीसह २३५७९ अंकांवर उघडला. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात निफ्टीच्या सर्व क्षेत्रीय निर्देशांकात तेजी दिसून येत होती. तर निफ्टी ऑटो निर्देशांक किंचित घसरणीवर कार्यरत होता. 

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात वाढ दर्शविणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये राष्ट्रीय केमिकल, सनोफी इंडिया, चंबल फर्टिलायझर्स, फॅक्ट, रामकृष्ण फोर्जिंग आणि कोचीन शिपयार्डच्या शेअर्सचा समावेश होता, तर वेबको इंडिया, सोभा, प्रेस्टीज इस्टेट, ग्रँड फार्मा, इंडस टॉवर्स, फिनिक्स मिल्स आणि गॉडफ्रे फिलिप्स या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. 

मल्टीबॅगर शेअरची स्थिती काय? 

वेदांता लिमिटेड, टाटा स्टील, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, टीसीएस, कोटक महिंद्रा बँक, विप्रो, ओएनजीसी, एचसीएल टेक आणि एचडीएफसी बँक या कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर एशियन पेंट्स, लार्सन, एसबीआय लाइफ, अशोक लेलँड, अशोका बिल्डकॉन आणि जेके पेपर या कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली.  

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात गौतम अदानी समूहाच्या १० पैकी ९ लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली होती. तर एनडीटीव्हीच्या शेअरमध्ये किरकोळ वाढ झाली. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये हजूर मल्टी प्रोजेक्ट्स, कॅमबाउंड केमिकल, बंधन बँक, गल्फ ऑईल, कजारिया सिरॅमिक, साऊथ इंडियन बँक, आयटीसी लिमिटेड, डीपी वायर्स आणि पंजाब नॅशनल बँकेच्या शेअर्सचा समावेश होता. तर एबीबी इंडिया, इरेडा, गेल, इंडियन ऑइल, एलआयसी, कंटेनर कॉर्पोरेशन या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. 

शेअर बाजाराचं कामकाज बुधवारी तेजीसह सुरू होऊ शकतं, असे संकेत निफ्टीकडून मिळाले होते. आशियाई शेअर बाजारात बुधवारी सकाळी तेजी दिसून आली.

टॅग्स :शेअर बाजार