Share Market Opening Bell : गुरुवारी शेअर बाजाराचं कामकाज तेजीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स २४२ अंकांच्या मजबुतीसह ७४६२४ अंकांवर उघडला, तर निफ्टी ५० निर्देशांक १७८ अंकांनी वधारून २२७९८ अंकांवर उघडला. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात निफ्टी फार्मा आणि निफ्टी एफएमसीजी निर्देशांक किरकोळ घसरण नोंदवत होते, तर इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांकात तेजी दिसून आली.
शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात वाढ दर्शविणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये एसबीआय, ओएनजीसी, एनटीपीसी, टाटा स्टील, कोल इंडिया लिमिटेड, पॉवर ग्रिड आणि अदानी एंटरप्रायझेस यांच्या समभागांचा समावेश होता, तर एचयूएल, सिप्ला, ब्रिटानिया, नेस्ले इंडिया, डिव्हिस लॅब, हिंडाल्को आणि सन फार्मा यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.
कोण आहे टॉप गेनर / लूझर
अमारा राजा बॅटरी, मिंडा इंडस्ट्रीज, केएनआर कन्स्ट्रक्शन, वर्धमान टेक्सटाइल्स, बिकाजी फूड्स, आदित्य बिर्ला रिटेल आणि मुथूट फायनान्स या कंपन्यांच्या शेअर्सनं सुरुवातीच्या व्यवहारात ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात गौतम अदानी समूहाच्या सर्व १० कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती. अदानी पोर्ट्सचे शेअर एक टक्क्यानं वधारले, तर अदानी पॉवरचे शेअर्स सहा टक्क्यांहून अधिक वधारले.
मल्टीबॅगर स्टॉकची स्थिती
शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचा शेअर ८ टक्क्यांहून अधिक वधारला आणि २७६ रुपयांच्या पातळीवर पोहोचला. गुरुवारी एनएचपीसी, इंजिनिअर्स इंडिया, भारत इलेक्ट्रॉनिक, इरकॉन इंटरनॅशनल, प्राज इंडस्ट्रीज, ओएनजीसी, अशोक लेलँड, विप्रो, एचसीएल टेक, इन्फोसिस, टीसीएस, लार्सन यांच्या शेअर्समध्ये तेजी होती, तर बँकिंग क्षेत्रातील आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्रा बँक यांच्या शेअर्समध्ये तेजी होती. एशियन पेंट्स आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे शेअर्स गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारात किरकोळ घसरणीसह व्यवहार करत होते.