शेअर बाजारात सातत्यानं नवनवीन विक्रम होत आहे. सोमवारी नव्या आठवड्याच्या कामकाजाच्या पहिल्याच दिवशी बीएसई सेन्सेक्स आणि एसएसई निफ्टीमध्ये वाढ दिसून आली. सेन्सेक्सनं ६५ हजार अकांचा पल्ला गाठला तर निफ्टीदेखील आपल्या आजवरच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला.
कामकाजाच्या सुरुवातीच्या सत्रात ११७ अंकांच्या तेजीसह ६४,८३६.१६ अंकांवर खुला झाला. त्यानंतर शेअर बाजारात तेजी कायम दिसून आली. यानंतर शेअर बाजारानं ६५,२३२.६४ अकांचा पल्ला गाठला. याशिवाय निफ्टीनंदेखील आजवरची उच्चांकी पातळी गाठली. निफ्टी ५७ अकांच्या तेजीसह १९,२४६.५० अंकांवर खुला झाला आणि १९,३३१.१५ अंकांच्या आजवरच्या उच्चांकी स्तरावर पोहोचला.
एचडीएफसीला मर्जरचा फायदा
नुकतंच एचडीएफसी आणि एचडीएफसी लिमिटेडचं मर्जर पूर्ण झालं. या मर्जरनंतर एचडीएफसी बँक जगातील चौथ्या क्रमांकाची मोठी बँक ठरली आहे. पण या मर्जरनं गुंतवणूकदारदेखील सुखावले आहेत. एचडीएफसी बँकेच्या शेअर्स मध्ये सोमवारी तुफान उसळी दिसून आली. यासोबतच बँकेचे शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले आहेत. सोमवारी सकाळी शेअर ५० रुपयांसह १७५१.९० रुपयांवर पोहोचला. हा आपल्या १७५५ रुपयांच्या आपल्या उच्चांकी स्तरापर्यंतही पोहोचला होता. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचाही परिणाम शेअर बाजारावर दिसून आला.