Join us

Sensex ची १५६४ अंकांची भरारी, 'या' कारणांमुळे शेअर बाजारानं घेतली झेप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 5:37 PM

Stock Market Sensex : आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजाराचा निर्देशांक 2.70 टक्क्यांनी म्हणजेच 1564 अंकांनी वाढून 59537 अंकांवर पोहोचला. गुंतवणूकदार सुखावले.

Stock Market Sensex : आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी शेअर बाजाराच्या निर्देशांकात मोठी वाढ दिसून आली. ३१ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीनिमित्त सुट्टी असल्यानं शेअर बाजाराचं कामकाज होणार नाही. मंगळवारी शेअर बाजाराचा निर्देशां 1564 अंकांनी वाढून 59537 अकांवर पोहोचला. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात 446 अंकांची वाढ होऊन तो 17759 अंकांवर पोहोचला.

मोठ्या घसरणीनंतर शेअर बाजाराच्या निर्देशांकानं घेतलेली ही झेप दिलासादायक असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्थेची कामगिरी चांगली आहे. याची अनेक कारणं आहेत. सरकारचं रिफॉर्म्सवर फोकस आहे. डायरेक्ट कर संकलनही वाढलं आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेतही गुंतवणूक वाढली आहे. ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत त्या त्या गोष्टी पोहोचत असल्याची प्रतिक्रिया बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंडाचे सीईओ ए बालासुब्रह्मण्यन यांनी दिली.

मंगळवारी निफ्टी रियल्टी इंडेक्समध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. यात तीन टक्क्यांची वाढ झाली. बँक, ऑटो, फायनॅन्शिअल सर्व्हिसेस इंडेक्समध्ये 2.7 टक्क्यांची वाढ झाली. आयटी इंडेक्समध्ये 2.5 टक्के आणि एफएमजीसीमध्ये 1.7 टक्क्यांची वाढ झाली.

युरोपमध्ये पॉझिटिव्ह मूड

मंगळवारी युरोपिय बाजारातील वाढीचा परिणाम भारतीय बाजारावरही दिसून आला. जर्मनीचा DAX 1.4 टक्क्यांनी वधारला. तर फ्रान्सच्या CAC मध्ये 1 टक्क्यांची वाढ दिसून येत होती. तर दुसरीकडे ब्रिटन, जपान आणि दक्षिण कोरियाच्या बाजारांमध्येही तेजी दिसून आली.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक