शुक्रवारी आठवड्याच्या कामकाजाच्या अखेरच्या दिवशी भारतीय शेअर बाजार जोरदार वाढीसह बंद झाले. सेन्सेक्सनं 320 अंकांची उसळी घेतली. तर निफ्टी 19,637 च्या पातळीवर पोहोचला. मजबूत जागतिक संकेतांचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला.
मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही जोरदार खरेदी दिसून आली. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज जवळपास अडीच लाख कोटी रुपयांची वाढ झाली. आयटी वगळता बीएसईचे इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांकही वाढीसह बंद झाले. फार्मा इंडेक्स 2 टक्क्यांहून अधिक वाढून बंद झाला.
कामकाजाच्या अखेरच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स 320.09 अंकांनी किंवा 0.49 टक्क्यांनी वाढून 65,828.41 अंकांवर बंद झाला. तर एनएसईचा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 114.75 अंकांच्या किंवा 0.59 टक्क्यांच्या वाढीसह 19,638.30 वर बंद झाला.
गुंतवणूकदारांची संपत्ती २.४५ लाखांनी वाढली
बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचं एकूण बाजार भांडवल आज 29 सप्टेंबर रोजी 319.10 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजेच 28 सप्टेंबर रोजी 316.65 लाख कोटी रुपये होते. अशा प्रकारे, बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप आज सुमारे 2.45 लाख कोटी रुपयांनी वाढलंय. दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 2.45 लाख कोटी रुपयांची वाढ झाली.
हे शेअर्स वधारले
सेन्सेक्समधील 30 पैकी 20 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्येही एनटीपीसीच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 3.26 टक्क्यांची वाढ झाली आहे. यानंतर टाटा मोटर्स, सन फार्मा, टाटा स्टील आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) चे शेअर्स 1.36 टक्के ते 2.77 टक्क्यांपर्यंत वाढले.
या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
तर उर्वरित सेन्सेक्समधील 10 शेअर्स आज घसरणीसह बंद झाले. यापैकी इन्फोसिसचे शेअर्स 0.62 टक्क्यांनी घसरले. याशिवाय एचसीएल टेक, टेक महिंद्रा, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) आणि टायटनच्या शेअर्समध्ये 0.31 ते 0.39 टक्क्यांची घसरण दिसून आली.
शेअर बाजारात पुन्हा उत्साह, सेन्सेक्स ३२० अकांनी वधारला; गुंतवणूकदारांनी कमावले २.४५ लाख कोटी
शुक्रवारी आठवड्याच्या कामकाजाच्या अखेरच्या दिवशी शेअर बाजार जोरदार वाढीसह बंद झाले.
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 04:18 PM2023-09-29T16:18:37+5:302023-09-29T16:18:56+5:30