Join us  

Sensex मध्ये ६९० अंकांची वाढ, गुंतवणूकदारांची संपत्ती वाढली; २९१ शेअर्स वर्षभराच्या उच्चांकी स्तरावर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 4:15 PM

HDFC बँकेसारख्या हेवीवेट शेअरच्या रिकव्हरीनं आज बाजाराला मजबूत आधार दिला.

Stock Market Closing Bell: HDFC बँकेसारख्या हेवीवेट शेअरच्या रिकव्हरीनं आज बाजाराला मजबूत आधार दिला. एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये आज 2 टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्येही वाढ दिसून आली. या आधारावर, देशांतर्गत इक्विटी बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी सुमारे 1 टक्क्यांनी मजबूत झाले. बाजाराच्या या वाढीमध्ये, बीएसई वर लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप आज 5.53 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे, म्हणजेच गुंतवणूकदारांचे संपत्तीत आज 5.53 लाख कोटी रुपयांनी वाढ झाली आहे.

इक्विटी बेंचमार्क निर्देशांकांबद्दल सांगायचं झाल्यास, आज सेन्सेक्स 689.76 अंकांच्या किंवा 0.98 टक्क्यांच्या उसळीसह 71060.31 वर बंद झाला आणि निफ्टी 215.15 अंकांच्या किंवा 1.01 टक्क्यांच्या उसळीसह 21453.95 वर बंद झाला. क्षेत्रीय निर्देशांकाबद्दल सांगायचं झाल्यास निफ्टीचा खाजगी बँकांचा निर्देशांक वगळता इतर सर्व निर्देशांक वाढीसह बंद झाले. निफ्टी बँक मध्ये 0.13 टक्क्यांची वाढ दिसून आली.गुंतवणूकदारांनी कमावले ५.५३ लाख कोटीबाजारातील तेजीमुळे आज गुंतवणूकदारांच्या भांडवलात वाढ झाली. 23 जानेवारी 2024 रोजी बीएसईवर लिस्टेड सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप 365.98 लाख कोटी रुपये होते. आज म्हणजेच 24 जानेवारी 2024 रोजी ते 371.51 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. याचा अर्थ आज गुंतवणूकदारांच्या भांडवलात 5.53 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.केवळ ५ शेअर्समध्ये घसरणसेन्सेक्सवर लिस्टेड असलेल्या 30 शेअर्सपैकी फक्त 5 रेड झोनमध्ये बंद झाले. टाटा स्टील, एचसीएल आणि पॉवर ग्रिडमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. दुसरीकडे, आज आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक आणि एशियन पेंटमध्ये सर्वात मोठी घसरण झाली.291 शेअर्स वर्षभराच्या उच्चांकी स्तरावरबीएसईवर उपलब्ध माहितीनुसार, आज 3884 शेअर्सचे व्यवहार झाले, त्यापैकी 2466 मध्ये वाढ दिसून आली, 1333 मध्ये घसरण, तर 85 मध्ये कोणताही बदल नाही. तर 291 समभागांनी एका वर्षाचा उच्चांकी स्तर तर 32 शेअर्सनं एका वर्षाचा नीचांकी स्तर गाठला. याशिवाय 339 शेअर्सना अपर सर्किट तर 270 शेअर्सना लोअर सर्किट लागलं.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक