Join us  

सेन्सेक्सनं घेतली 1000 अंकांची मोठी उडी, अंबानींच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट, गुंतवणूकदार मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2023 12:08 AM

बाजारातील या तेजीमध्ये मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या ​​(रिलायन्स स्टॉक) शेअर्सनी रॉकेट स्पीड घेतला आहे. 

शेअर बाजारात शुक्रवारी चांगली तेजी दिसून आली. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर 30 शेअर्सचा सेन्सेक्स 1000 हून अधिक अंकांच्या उसळीसह व्यवहार करत होता. याच बरोबर नॅशनल स्टॉक एक्सचेन्जच्या निफ्टीतही जबरदस्त वाढ दिसून आली. बाजारातील या तेजीमध्ये मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या ​​(रिलायन्स स्टॉक) शेअर्सनी रॉकेट स्पीड घेतला आहे. 

Sensex मध्ये 1045 अंकांची उसळी -आठवड्यातील व्यवहाराच्या अखेरच्या दिवशी अर्थात शुक्रवारी  Stock Market ची सुरुवात हिरव्या निशानावरून झाली होती. यानंतर BSE Sensex जवळपास 1,030 अंक अथवा 1.78 टक्क्यांच्या जबरदस्त तेजीसह 59,991 वर पोहोचला. तसेच NSE Nifty जवळपास 279 अंक अथवा 1.63 टक्क्यांच्या उसळीसह 17,359 पातळीवर पोहोचला. बँकेच्या निफ्टीतही आज अशीच तेजी दिसून आली. Reliance च्या शेअरने घेतली 4.50 टक्क्यांची उसळी - आज मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा शेअर टॉप गेनर होऊन ट्रेड करत होता. Reliance Stock 4.31 टक्के अथवा 96.25 रुपयांच्या तेजीसह 2,330.95 रुपयांवर पोहोचला आहे. याशिवाय बीएसईवर लिस्टेड ICICI Bank, Nestle इंडिया, Tata Motors चे शेअरही हिरव्या निशाणावर व्यवहार करत होते.

टॅग्स :शेअर बाजारमुकेश अंबानीरिलायन्स