Join us  

शाहरुखच्या 'Dunki'ची कमाल; रिलीजपूर्वीच PVR ने केली 493 कोटींची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 5:42 PM

शाहरुख खानच्या आगामी 'डंकी' चित्रपटाचे जबरदस्त अॅडव्हान्स बुकिंग सुरू आहे.

Shahrukh Khan Dunki PVR Cinema  ( Marathi News ): अभिनेता शाहरुख खानच्या आगामी 'डंकी' सिनेमाची अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे. या बुकिंगचे आकडे समोर आल्यापासून PVR आयनॉक्सच्या शेअर्सचे शेअर्स 3 टक्क्यांनी वधारले. यामुळे PVR आयनॉक्सने सोमवारपासून 493 कोटी रुपयांहून अधिकची कमाई केली. 

6 डिसेंबर ते 19 डिसेंबर दरम्यान डंकीच्या अॅडव्हान्स बुकिंगमध्ये मोठी वाढ झाली. दुसरीकडे, अभिनेता प्रभासचा 'सालार'देखील रिलीज होतोय. दक्षिणेकडील राज्यात त्या चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग जोरात सुरू आहे. याचा फायदा PVR च्या शेअर्सवर पाहायला मिळाला. गुरुवारी आणि शुक्रवारीही शेअर्समध्ये ही वाढ दिसून येईल, असा तज्ञांचा अंदाज आहे. सोमवारी चित्रपटाच्या वीकेंडचे आकडे येतील, तेव्हा PVR आयनॉक्सच्या शेअर्समध्ये अजून वाढ होऊ शकते. 

सोमवारपासून पीव्हीआरच्या शेअर्समध्ये सुमारे 3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार, आजच्या ट्रेडिंग सत्रात कंपनीचे शेअर्स 1825.90 रुपयांपर्यंत वाढले. गेल्या आठवड्यातील शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी कंपनीचे शेअर्स रु. 1775.65 वर बंद झाले होते. याचा अर्थ तेव्हापासून आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये 50.25 रुपयांची, म्हणजेच 2.80 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. 

पीव्हीआर आयनॉक्सच्या शेअर्समध्ये झालेल्या या वाढीमुळे मार्केट कॅपमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यातील शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी कंपनीचे मार्केट कॅप रु. 17,424.97 कोटी होते. तर आजच्या ट्रेडिंग सत्रात कंपनीचे मार्केट कॅप रु. 17,918.09 कोटी झाले. म्हणजेच पीव्हीआर आयनॉक्सच्या शेअर्समध्ये 493.12 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

डंकीची जबरदस्त अॅडव्हान्स बुकिंगशाहरुख खानच्या आगामी ‘डंकी’ चित्रपटाची जोरदार अॅडव्हान्स बुकिंग पाहायला मिळत आहे. आतापर्यंत 10.39 कोटी रुपयांची तिकीटे विकल्या गेली आहेत. पहिल्या दिवशी देशभरात 12,720 शोसाठी एकूण 3,64,487 तिकिटे विकली गेली आहेत. बुकिंगसाठी सरासरी तिकीट किंमत 263 रुपये आहे. मूव्ही हबच्या मते, “डंकी” ने परदेशातील आगाऊ बुकिंगमध्ये “सालार” ला मागे टाकले आहे. 

टॅग्स :शाहरुख खानडंकी' चित्रपटशेअर बाजारशेअर बाजारव्यवसाय