Shakti Pumps Share Price: आठवड्याच्या शेवटचा दिवस(15 मार्च) शक्ती पंप्स (इंडिया) साठी चांगला ठरला. कंपनीला महाराष्ट्र सरकारकडून मोठी वर्क ऑर्डर मिळाल्यामुळे शेअर्स 5% अप्पर सर्किटवर पोहोचले. सकाळी 11 च्या सुमारास NSE वर शक्ती पंप्सचे शेअर्स 5 टक्क्यांनी किंवा सुमारे 61 रुपयांनी वाढून 1,279.65 रुपयांवर व्यवहार करत होते. कंपनीच्या शेअर्समध्ये 3,000 हून बाय ऑर्डर पेंडिंग होत्या.
शक्ती पंप्सने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला महाराष्ट्र एनर्जी डिपार्टमेंट एजन्सी (MEDA) कडून PM-KUSUM योजनेच्या घटक-B अंतर्गत महाराष्ट्रातील विविध ठिकाणी 3,500 सोलर फोटोव्होल्टेइक वॉटर पंपिंग सिस्टम (SPWPS) बसवण्याची वर्क ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरमध्ये डिझायनिंग, कंस्ट्रक्शन, सप्लाय, ट्रांसपोर्टेशन, इन्स्टॉलेशन, टेस्टिंग आणि कमिशनिंगचा समावेश आहे. वर्क ऑर्डर जारी केल्यापासून 120 दिवसांत पूर्ण करणे आवश्यक आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच(13 मार्च) कंपनीने हरियाणा रिन्युएबल एनर्जी डिपार्टमेंट (HAREDA) कडून कुसुम-3 योजनेअंतर्गत 2,130 पंपांसाठी अंदाजे 73.32 कोटी रुपयांची चौथी वर्क ऑर्डर प्राप्त झाली आहे. त्यापूर्वी, 24 फेब्रुवारी रोजी 2,443 पंपांसाठी 84.30 कोटी रुपयांची तिसरी वर्क ऑर्डर मिळाली होती. या सर्व वर्क ऑर्डर्समुळे कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होताना दिसत आहे.
शक्ती पंप्सचे शेअर
शक्ती पंप्सच्या शेअर्सनी 2 फेब्रुवारी 2024 रोजी 1,599.50 रुपयांच्या 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला होता. तर, 27 मार्च 2023 रोजी हाच शेअर फक्त 388.70 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. सध्या स्टॉक या पातळीपेक्षा सुमारे 229.7 टक्के अप्पर सर्किटवर व्हवहार करत आहे. गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्सने सूमारे सुमारे 212.49% परतावा दिला आहे.
(टीप-शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)