Shakti Pumps share : गेल्या काही काळापासून सोलार एनर्जी क्षेत्रातील कंपन्यांसाठी अच्चे दिन आले आहेत. अशातच, शेअर बाजारातील चढ-उतार दरम्यान शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड (SPIL) चे शेअर्स आठवड्याच्या पहिल्याच दिवशी रॉकेट वेगाने वाढले. दिवसभरातील व्यवहारादरम्यान शेअरला 5 टक्क्यांचा अप्पर सर्किट लागला आणि किंमत 2285 रुपयांपर्यंत पोहोचली. हा या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक आहे.
गेल्या पाच दिवसांपासून हा शेअर वाढत आहे. गेल्या आठवड्यात शेअर 28 टक्क्यांनी वाढला होता. 14 मार्च 2024 रोजी रु. 1121 वरुन, हा स्टॉक दुप्पट किंवा 104 टक्क्यांनी वधारला. तर, गेल्या एका वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना 420 टक्के परतावा दिला आहे.
इंट्राडे ट्रेडिंगसाठी परवानगी नाही
सध्या शक्ती पंप्स इंडियाचे शेअर्स त्यांच्या क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट (QIP) किमतीपेक्षा(1208 रु.) 89 टक्के जास्त आहेत. मार्चमध्ये कंपनीने QIP इश्यूद्वारे 200 कोटी रुपये उभारले होते. दरम्यान, शक्ती पंप्स इंडिया सध्या 'T' सेगमेंटमध्ये व्यवहार करत आहे. या विभागातील शेअर्सचे सेटलमेंट ट्रेड टू ट्रेड सेगमेंटमध्ये होतात. या शेअर्सना इंट्राडे ट्रेडिंगसाठी परवानगी नाही.
कंपनीचा तिमाही निकाल
शक्ती पंप्स इंडियाचा नफा मार्च तिमाहीत रु. 2.2 कोटींवरून रु. 89.7 कोटी झाला आहे. तर, महसूल वार्षिक 233.6 टक्क्यांनी वाढून 609.30 रुपये झाला. EBITDA मार्जिन 21.5 टक्क्यांनी वाढले आहे. शक्ती पंप्स इंडिया एकमेव कंपनी आहे, जी इन-हाऊस सोलर पंप इन्स्टॉलेशनसाठी विविध गोष्टींचे उत्पादन करते. विशेष म्हणजे, कंपनीकडे सध्या अनेक ऑर्डर्स आहेत. मार्च तिमाहीपर्यंत या ऑर्डर बुकची रक्कम 2,400 कोटी रुपये होती. अलीकडेच हरियाणा आणि महाराष्ट्रातून 250.62 कोटी रुपयांच्या तीन नवीन ऑर्डरसह मिळाल्या आहेत.
(टीप-शेअर बाजारातगुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)