Join us  

IPO असावा तर असा! ५ वर्षांत ४५०० टक्क्यांचं रिटर्न, गुंतवणूकदार मालामाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2024 1:08 PM

कंपनीच्या आयपीओची किंमत 41 रुपये प्रति शेअर होती. आज याची किंमत 1800 रुपयांच्या पुढे आहे.

शेअर इंडिया सिक्युरिटीज (Share India Securities) हा आयपीओपैकी एक आहे ज्यानं गुंतवणूकदारांना काही वर्षांत श्रीमंत केलंय. कंपनीच्या आयपीओची किंमत 41 रुपये प्रति शेअर होती. आज याची किंमत 1800 रुपयांच्या पुढे आहे. म्हणजे गुंतवणूकदारांनी 4500% इतका मोठा नफा कमावला आहे. दरम्यान, ब्रोकरेज हाऊसनं आगामी काळात कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी वाढ होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केलाय.2017 मध्ये आलेला आयपीओशेअर इंडिया सिक्युरिटीजचा आयपीओ 2017 मध्ये आला होता. तेव्हा कंपनीने प्राइस बँड प्रति शेअर 41 रुपये ठेवला होता. एका लॉटमध्ये 3000 शेअर्स ठेवण्यात आले होता. त्यामुळे गुंतवणूकदारांना किमान 123000 रुपयांची गुंतवणूक करावी लागली. मंगळवारी म्हणजेच 2 जानेवारी रोजी कंपनीचे शेअर्स 1800 रुपयांच्या वर व्यवहार करत होते. ज्या गुंतवणूकदारांना आयपीओमधून शेअर्स वाटप झालं होतं त्यांची 1.23 लाख रुपयांच्या गुंतवणूकीचं मूल्य वाढून 56 लाख झालं आहे.एक्सपर्ट बुलिशदेशांतर्गत ब्रोकरेज फर्म प्रॉफिट मार्ट सिक्युरिटीजनं विश्वास व्यक्त केलाय की शेअर इंडिया सिक्युरिटीज लिमिटेड कंपनीच्या शेअरच्या किमती आगामी काळात 25 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात. गेल्या 6 महिन्यांत या शेअरनं पोझिशनल गुंतवणूकदारांना 44 टक्के रिटर्न दिले आहेत. कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 1882.65 रुपये प्रति शेअर आणि 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 986.45 रुपये प्रति शेअर आहे. सध्या कंपनीचे मार्केट कॅप 5951.41 कोटी रुपये आहे.(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकइनिशिअल पब्लिक ऑफरिंग