Nykaa ची पॅरेंट कंपनी FSN ई-कॉमर्स व्हेंचर्सच्या शेअरमध्ये आज जबरदस्त तेजी दिसून आली आहे. कंपनीचा शेअर मंगळवारी इंट्रा डे ट्रेडमध्ये 8 टक्क्यांनी वाढून 132.70 रुपयांवर पोहोचला आहे. केवळ एका नियुक्तीमुळे शेअरमध्ये ही तेजी आल्याचे बोलले जात आहे. खरे तर ब्यूटी अँड फॅशन कंपनीने चीफ फायनानंस ऑफिसर म्हणून पी गणेश यांची नियुक्ती करण्याची घोषणा केली आहे. महत्वाचे म्हणजे, कंपनीचे शेअर आपल्या लाइफ टाईम हाय 429 रुपयांपेक्षा 72 टक्क्यांनी खालच्या पातळीवर आहेत.
नायकाच्या शेअरची स्थिती -
नायकाचा शेअर 125.50 वर खुला झाला आणि 134.40 वर बंद झाला. कंपनीच्या शेअरची किंमत आपल्या आयपीओ व्हॅल्यूएशनवर आकर्षित करण्यासाठी चर्चेत होती. कारण हिच्या लिस्टिंगपासून प्री-आयपीओ गुंतवणूकदारांनी आवश्यक लॉक-इन संपल्यानंतर वाटा विकला होता. स्टॉक 24 जानेवारीपर्यंत सातत्याने आठ सत्रांपर्यंत घसरला. सोमवारी Nykaaचा शेअर बीएसईवर 1.96 टक्यांच्या घसरणीसह 124.75 वर बंद झाला होता.
परदेशी गुंतवणूकदारांत उत्सुकता -
न्यू ऐज टेक कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण होत असतानाही परदेशी गुंतवणूकदार (FII) आणि म्युच्युअल फंड्स (Mutual funds) यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत. तसेच ब्रोकरेजही या शेअरवर बुलिश दिसत आहेत. डिसेंबर तिमाहीत एफआयआयने आपली हिस्सेदारी अनुक्रमे 6.5 टक्यांनी वाढवून 11 टक्के केली आहे.
तर म्युच्युअल फंडनेही आपली गुंतवणूक दुप्पट केली आहे आणि एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्समध्ये 4 टक्के हिस्सेदारी मिळवली आहे. प्राइम डाटाबेसनुसार, गेल्या महिन्यातच म्युच्युअल फंड्सने नायकाचे 400 कोटी रुपयांपेक्षाही अधिकचे शेअर्स खरेदी केले आहेत.