आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. कमकुवत जागतिक संकेतांमुळे बाजारात ही घसरण दिसत आहे. खरे तर सकाळी घसरणीसोबतच बाजार खुला झाला. सेन्सेक्स 671.15 अंकांनी घसरून 59,135.13 रुपयांवर बंद झाला आहे. तर निफ्टीही 176.70 अंकांच्या घसरणीसह 17,412.90 रुपयांवर बंद झाली. बाजारात घसरण दिसत असली तरी, अदानी समूहाच्या काही कंपन्यांच्या शेअर्समध्ये आजही तेजी दिसून आली. अदानी समूहाच्या 10 पैकी तीन कंपन्यांचे शेअर्स अपर सर्किटवर बंद झाले आहेत. तर पाच कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण बघायला मिळाली आहे.
अपर सर्किटवर बंद झाले हे स्टॉक -आज दिवसभर बाजारातात घसरण असताना अदानी ग्रीन एनर्जी (Adani Green Energy) आणि अदानी ट्रान्समिशनचे (Adani Transmission) शेअर बाजार खुला होताच अपर सर्किटवर पोहोचले. याशिवाय अदानी टोटल गॅस (Adani Total Gas) मध्येही तेजी बघायला मिळाली. अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर सकाळी 675.00 रुपयांवर ओपन झाला. यानंतर हा शेअर पाच टक्क्यांची उसळी घेत 682.70 रुपये या आपल्या अपर सर्किटवर पोहोचला.
अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअरमध्येही दिवसभर तेजी दिसून आली. हा शेअरही अपर सर्किटवर बंद झाला. अदानी ट्रांसमिशनचा शेअर सकाळी 877.00 रुपयांवर खुला झाला होता. यानंतर हाही पाच टक्क्यांच्या उसळीसह 904.45 रुपयांच्या अपर सर्किटवर पोहोचला. अदानी टोटल गॅसचा शेअरही सकाळी 910.00 रुपयांवर खुला झाला. यानंतर 45.20 अंकांच्या उसळीसह तोही 949.60 रुपयांच्या आपल्या अपर सर्किटवर पोहोचला.
अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनमिक झोनच्या (APSEZ) शेअरमध्येही आज सकाळी तेजी दिसून आली. हा शेअर वाढीसह 699 रुपयांवर बंद झाला.