एका शेअने आपल्या गुंतवणूकदारांना फक्त 5 दिवसांतच मालामाल केले आहे. हा एक SME कंपनीचा शेअर आहे. अद्वैत इंफ्राटेक (Advait Infratech) असे या शेअरचे नाव आहे. कंपनीचा शअर आज सोमवारी 10 टक्क्यांच्या तेजीसह 410.95 रुपयांवर पोहोचला आहे.
पाच दिवसांत 104 टक्क्यांहून अधिकचा परतावा -
शेअर बाजारात सप्टेंबर 2020 मध्ये या शेअरची सुरुवात झाली होती. गेल्या पाच ट्रेडिंग दिवसांत या स्टॉकने 104.96 टक्क्यांची उसळी घेतली आहे. याच्या तुलनेत एसअँडपी बीएसई सेंसेक्स या कालावधी दरम्यान जवळपास 1 टक्क्यांनी खाली राहिला.
कंपनी म्हणते कारण माहीत नाही -
कंपनीच्या शेअरमध्ये अचानक आलेल्या तेजीनंतर, आपल्याला कंपनीच्या शेअरची किंमत अचानकपणे कशी वाढली याचे कारण कळू शकलेले नाही, असे अद्वैत इंफ्राटेक म्हटले आहे. शेअर्सच्या किमतीतील चढउतार हा पूर्णपणे बाजारावरच अवलंबून असतो. अद्वैत इंफ्राटेकने गेल्या शुक्रवारीच यासंदर्भातील बाजाराला माहिती देताना सांगितले होते, की "आपल्या शेअर्सची किंमती अचानकपणे कशामुळे वाढली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही."