Lokmat Money >शेअर बाजार > 99% घसरला होता अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर, आता केली कमाल; साडेतीन वर्षांत 1 लाखाचे बनवले 19 लाख!

99% घसरला होता अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर, आता केली कमाल; साडेतीन वर्षांत 1 लाखाचे बनवले 19 लाख!

रिलायन्स इंफ्रास्ट्रक्चरच्या शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक 215.50 रुपये आहे. तर, 52 आठवड्यांतील निचांक 114.60 रुपये आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 08:43 PM2023-10-02T20:43:14+5:302023-10-02T20:44:08+5:30

रिलायन्स इंफ्रास्ट्रक्चरच्या शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक 215.50 रुपये आहे. तर, 52 आठवड्यांतील निचांक 114.60 रुपये आहे.

share market Anil Ambani's company reliance infrastructure shares had fallen by 99%, now it has become 1 lakh into 19 lakhs in just three and a half years | 99% घसरला होता अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर, आता केली कमाल; साडेतीन वर्षांत 1 लाखाचे बनवले 19 लाख!

99% घसरला होता अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर, आता केली कमाल; साडेतीन वर्षांत 1 लाखाचे बनवले 19 लाख!

शेअर बाजारात केव्हा कोणता शेअर आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल आणि कंगाल करेल, हे सांगता येत नाही. अनिल अंबानी समूहाच्या रिलायन्स इंफ्रास्ट्रक्चरच्या शेयरने गेल्या काही वर्षांत रॉकेट स्पीड घेतला आहे. खरे तर, आपल्या उच्चांकी पातळीवरून 99 टक्क्यांनी घसरल्यानंतर, रिलायन्स इंफ्रास्ट्रक्चरचा (Reliance Infrastructure) शेअर आता 1700 टक्क्यांहून अधिक वधारला आहे. या कालावधीत रिलायन्स इंफ्राचा शेअर 9 रुपयांवरून 170 रुपयांवर पोहोचला आहे. रिलायन्स इंफ्रास्ट्रक्चरच्या शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक 215.50 रुपये आहे. तर, 52 आठवड्यांतील निचांक 114.60 रुपये आहे.

रिलायन्स इंफ्रास्ट्रक्चरचा शेअर 4 जानेवारी 2008 रोजी  2510.35 रुपयांवर होता. यानंतर तो 99 टक्क्यांनी घसरून 27 मार्च 2020 रोजी 9.20 रुपयांवर आला. मात्र यानंतर या शेअरमध्ये जबरदस्त तेजी आली. हा शेअर 29 सप्टेंबर 2023 रोजी 173.20 रुपयांवर बंद झाला. रिलायन्स इंफ्राचे मार्केट कॅप 6860 कोटी रुपये आहे.

साडेतीन वर्षांत 1 लाखाचे केले 19 लाख -
रिलायन्स इंफ्रास्ट्रक्चरचा शेअर 27 मार्च 2020 रोजी 9.20 रुपयांवर होता. तो 29 सप्टेंबर 2023 रोजी 173.20 रुपयांवर बंद झाला. या शेअरने गेल्या साडेतीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 1783% परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने 27 मार्च 2020 रोजी रिलायन्स इंफ्रास्ट्रक्चरच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती आतापर्यंत कायम ठेवली असती तर, आता त्याचे 18.83 लाख रुपये झाले असते. या वर्षाचा विचार करता, रिलायन्स इंफ्रास्ट्रक्चरच्या शेअरमध्ये या वर्षात आतापर्यंत 27 टक्क्यांची तेजी आली आहे. तसेच, गेल्या 6 महिन्यांत कंपनीच्या शेअरने 19 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

Web Title: share market Anil Ambani's company reliance infrastructure shares had fallen by 99%, now it has become 1 lakh into 19 lakhs in just three and a half years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.