Join us

Share Market Today : शेअर बाजार सपोर्ट लेव्हलवर, दिवाळीपूर्वी होऊ शकते घसरण; अपर लेव्हलवर सेलर्स सक्रिय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 10:13 AM

Share Market Update Today : शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात मंगळवारी किरकोळ वाढीसह झाली.

Share Market : शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात मंगळवारी किरकोळ वाढीसह झाली. मंगळवारी निफ्टीमध्ये १७ अंकांच्या वाढीनंतर २४७९९ च्या पातळीवर व्यवहार सुरू झाला. तर सेन्सेक्स ४ अंकांच्या वाढीसह ८१,१५५ वर खुला झाला.

बँकिंग आणि आयटी क्षेत्रात खरेदीचा कल दिसून येत आहे. आज पुन्हा या दोन्ही क्षेत्रांतील हेवीवेट शेअर्स गुंतवणूकदारांच्या रडारवर आहेत. एफएमसीजी आणि फार्मा क्षेत्रातही खरेदी दिसून येत आहे.

अल्ट्राटेक सिमेंट, टायटन कंपनी, पॉवर ग्रिड, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक आणि ग्रासिम इंडस्ट्रीज च्या शेअर्समध्ये निफ्टी ५० पॅकमधून सर्वाधिक खरेदी दिसून येत आहे. तर दुसरीकडे, निफ्टी ५० निर्देशांकातील सुरुवातीला टाटा स्टील, बीईएल, बीपीसीएल आणि हीरो मोटोकॉर्प सारख्या शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे.

शेअर बाजाराच्या सोमवारच्या सत्रात बाजार तेजीसह उघडला, पण ती तेजी कायम राहू शकली नाही आणि बाजार दिवसभराच्या नीचांकी पातळीजवळ बंद झाला. निफ्टी ७३ अंकांच्या घसरणीसह बंद झाला. तर दुसरीकडे सोमवारी डाऊ जोन्स इंडस्ट्रियल एव्हरेज आणि एस अँड पी ५०० घसरणीसह बंद झाले.

टॅग्स :शेअर बाजार