Join us

सरकारी कंपन्यांचे शेअर्स सुसाट; डीलनंतर, 52 आठवड्यांतील हाय लेव्हलला पोहोचले शेअर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 1:21 AM

या दोन कंपन्यांच्या कराराची घोषणा झाल्यानंतर, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे शेअर आपल्या 52 आठवड्यांतील नव्या उच्चांकावर पोहोचला आहे.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) आणि NHPC या दोन सरकारी कंपन्यांनी इंटीग्रेटेड सोलार मॅन्युफॅक्चरिंग युनिट बसविण्यासाठी करार केला जातो. या दोन्ही कंपन्यांनी मंगळवारी सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी केली आहे. या दोन कंपन्यांच्या कराराची घोषणा झाल्यानंतर, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे शेअर आपल्या 52 आठवड्यांतील नव्या उच्चांकावर पोहोचला आहे. कंपनीच्या शेअरमध्ये तेजी आल्याने, BEL चे मार्केट कॅप वाढून 72,757 कोटी रुपये झाले आहे.

6 महिन्यांत 25% नी वाढले NHPC चे शेअर...NHPC लिमिटेडने आपल्या रेग्युलेटरी फायलिंगमध्ये म्हटले आहे, 'कळविण्यात येते, की NHPC आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने 23 ऑगस्ट 2022 रोजी गीगा व्हॉट स्केल व्हर्टिकली इंटीग्रेटेड सोलर मॅन्युफॅक्चरिंग युनिट लावण्यासाठी सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी केली आहे'. NHPC लिमिटेडचे शेअर्स 34 रुपयांवर बॉम्बे स्टॉक एक्सचन्जमध्ये जवळपास फ्लॅट आहेत. तसेच, NHPC चे मार्केट कॅप जवळपास 34,153 कोटी रुपये आहे. महत्वाचे म्हणजे, गेल्या 6 महिन्यांत NHPC च्या शेअर्समध्ये 25 पर्सेंट ची वाढ झाली होती.

300 रुपयांच्या जवळपास पोहोचले BEL चे शेअर -MoU नंतर, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी बघायला मिळाली आहे. कंपनीच्या शेअरने मंगळवारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर (BSE) 52 आठवड्यांतील आपली सर्वोच्च पातळी गाठली आहे. BEL चा शेअर 299.50 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या 6 महिन्यांत भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या शेअर्समध्ये 59 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. तसेच, या वर्षी आतापर्यंत कंपनीचा शेअर जवळपास 42 टक्यांनी वाढला आहे. 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक