एका छोट्या कंपनीच्या शेअर्सनी मंगळवारी रॉकेट स्पीड घेतला आहे. या कंपनीचे नाव व्हर्चुओसो ऑप्टोइलेक्ट्रॉनिक्स (Virtuoso Optoelectronics) असे आहे. एसएमई कंपनीचे शेअर्स मंगळवारी दिवसभरात 15% चढून 186 रुपयांवर पोहोचले आहेत. एवढेच नाही, तर या कंपनीच्या शेअरने 52 आठवड्यांचा नवा उच्चांकही गाठला आहे. दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया देखील या व्हर्चुओसो ऑप्टोइलेक्ट्रॉनिक्सवर मोठा डाव लावत आहेत.
कंपनीच्या बोर्डाने शेअर बाजारात 'बिग व्हेल' नावाने प्रसिद्ध असलेले आशीष कचौलिया आणि इतर काही इनव्हेस्टर्सना प्रेफरेंशिअल रूटच्या माध्यमाने इक्विटी शेअर जारी करण्यास मंजुरी दिली आहे.
24.6 लाख रुपयांपर्यंत शेअर जारी करण्यास मंजुरी -
व्हर्चुओसो ऑप्टोइलेक्ट्रॉनिक्सने (Virtuoso Optoelectronics) एक्सचेन्ज फायलिंगमध्ये सांगितले आहे की, कंपनीच्या बोर्डाने 142.50 रुपये प्रति शेअर या दराने प्रेफरेंशिअल रूटच्या माध्यमाने काही आयडेंटिफाइड नॉन प्रमोटर पर्सन्सना 24.6 मिलियन शेअर जारी करण्याची परवानगी दिली आहे. बोर्डाने आशीष कचौलिया आणि बंगाल फायनांस अँड इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रत्येकाला 1.23 मिलियनपर्यंत (अॅलॉटमेंटनंतर टोटल इक्विटीच्या 5.38 टक्के) शेअर जारी करण्यास मंजुरी दिली आहे. कंपनीचे शेअर 15 सप्टेंबर 2022 ला BSE SME एक्सचेंजमध्ये लिस्ट झाले होते.
126 रुपयांवरून 170 रुपयांवर पोहोचले कंपनीचे शेअर -
व्हर्चुओसो ऑप्टोइलेक्ट्रॉनिक्सच्या शेअर्समध्ये गेल्या 3 आठवड्यांत जबरदस्त तेजी दिसून आली आहे. कंपनीचे शेअर 10 जानेवारी 2023 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेन्जवर 126 रुपयांवर होते. ते 31 जानेवारी 2023 ला बीएसईवर 173.50 रुपयांवर बंद झाले. व्हर्चुओसो ऑप्टोइलेक्ट्रॉनिक्सच्या शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक 186 रुपये आहे. तसेच, कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांतील निचांक 110.20 रुपये आहे.