Lokmat Money >शेअर बाजार > Share Market Open: अमेरिकेत व्याजदर वाढीचे संकेत, भारतात बाजार उघडताच Sensex कोसळला!

Share Market Open: अमेरिकेत व्याजदर वाढीचे संकेत, भारतात बाजार उघडताच Sensex कोसळला!

Share Market Open: अमेरिकेत अंदाजीत आकडेवारीहून अधिक महागाईच्या दरात वाढ झाल्यामुळे आता फेडरल रिझर्व्ह बँकेकडून या आठवड्यात पुन्हा एकदा व्याज दरात वाढ केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 10:17 AM2022-09-19T10:17:55+5:302022-09-19T10:19:43+5:30

Share Market Open: अमेरिकेत अंदाजीत आकडेवारीहून अधिक महागाईच्या दरात वाढ झाल्यामुळे आता फेडरल रिझर्व्ह बँकेकडून या आठवड्यात पुन्हा एकदा व्याज दरात वाढ केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

share market bse sensex nse nifty latest update ahead of us federal reserve rate hike | Share Market Open: अमेरिकेत व्याजदर वाढीचे संकेत, भारतात बाजार उघडताच Sensex कोसळला!

Share Market Open: अमेरिकेत व्याजदर वाढीचे संकेत, भारतात बाजार उघडताच Sensex कोसळला!

Share Market Open: अमेरिकेत महागाईच्या दरात अंदाजीत आकडेवारीपेक्षाही अधिक वाढ झाल्यामुळे आता फेडरल रिझर्व्ह बँकेकडून या आठवड्यात पुन्हा एकदा व्याज दरात वाढ केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याचेच परिणाम जगभरातील गुंतवणुकीवरही पाहायला मिळत आहेत. शेअर बाजारात पडझड होत असून भारतीय शेअर बाजारातही याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. सलग चौथ्या दिवशी भारतीय शेअर बाजारावर दबाव आहे. बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) आणि एनएसई निफ्टी (NSE Nifty) दोन्हींची सुरुवात पडझडीनं झाली आहे. 

प्री-ओपन सेशनमध्ये इतकी घसरण
शेअर बाजारात आज प्री-ओपन सेशनमध्येच घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स जवळपास १०० अंकांच्या घसरणीसह ५८,७५० अंकांवर व्यवहार करत होता. तर निफ्टी प्री-ओपन सेशनमध्ये १७,५४० अंकांवर जवळपास एकदम फ्लॅट व्यवहार करत होता. दुसरीकडे सिंगापूरमध्ये एसजीएक्स निफ्टीचा फ्यूचर कान्ट्रॅक्ट सकाळी ९ वाजता ६.५ अंकांचा किरकोळ वाढीसह १७,५६९.५ अंकांवर व्यवहार करताना पाहायला मिळाला. हे आकडे पाहता आज भारतीय बाजारावरही काही प्रमाणात दबाव पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी सेन्सेक्स जवळपास २४० अंकांच्या घसरणीसह ५८,६०० अंकांवर व्यवहार करत होता. तर निफ्टी जवळपास ६५ अंकांच्या घसरणीसह १७,४७० अंकांवर व्यवहार करत होता. 

शेअर बाजारात सातत्यानं घसरणीचं सत्र
गेल्या आठवड्यात सलग तीन दिवस शेअर बाजारात पडझडीचं वातावरण पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी सेन्सेक्स तब्बल १,०९३.२२ अंकांच्या घसरणीसह ५८,८४० अंकांवर बाजार बंद झाला होता. तर निफ्टी ३४६ अंकांच्या घसरणीसह १७,५३० अंकांवर बंद झाला होता. बुधवारी देखील भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात उलथा-पालथ पाहायला मिळाली होती. सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्समध्ये ७०० अंकांची घसरणीची नोंद झाली होती. बुधवारच्या अखेरच्या सत्रात थोडं सकारात्मक वातावरण पाहायला मिळालं होतं पण त्याचा फार काही परिणाम झाला नाही. 

Web Title: share market bse sensex nse nifty latest update ahead of us federal reserve rate hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.