Share Market Live Updates 3 May: सकाळच्या सत्रातील तेजीनंतर शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. सेन्सेक्स तब्बल १००३ अंकांनी आपटून ७३६१० अंकांवर ट्रेड करत आहे. सेन्सेक्सवर बजाज फायनान्स आणि बजाज फिनसर्व्हचे शेअर्स ग्रीन झोनमध्ये आहेत. सेन्सेक्समधील या मोठ्या घसरणीत, रिलायन्स इंडस्ट्रिज, एचडीएफसी बँक, एल अँड टी आणि भारती एअरटेलचा वाटा आहे.
बीएसईवर ३८८८ स्टॉक्स ट्रेड करत आहेत आणि त्यापैकी २५५१ शेअर्स रेड झोनमध्ये आहेत. तर १२१८ शेअर्स ग्रीन झोनमध्ये आहेत. यानंतरही २७६ स्टॉक्समध्ये अपर सर्किट आणि २५८ शेअर्समध्ये लोअर सर्किट लागलं.
सकाळच्या सत्रात तेजी
शेअर बाजाराचं कामकाज शुक्रवारी तेजीसह सुरू झालं होतं. बीएसई सेन्सेक्स ४२६ अंकांच्या वाढीसह ७५०३८ अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १२५ अंकांच्या वाढीसह २२७७३ अंकांवर उघडला. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात निफ्टी मिडकॅप १००, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी, निफ्टी बँक, निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांकात चांगली वाढ नोंदविण्यात आली होती. परंतु त्यानंतर आता मोठ्या प्रमाणात घसरण झाली.