Lokmat Money >शेअर बाजार > याला म्हणतात धमाका! ₹2 चा शेअर ₹59 वर आला, एका वर्षात 2051% परतावा दिला; 6 महिन्यांपासून करतोय मालामाल

याला म्हणतात धमाका! ₹2 चा शेअर ₹59 वर आला, एका वर्षात 2051% परतावा दिला; 6 महिन्यांपासून करतोय मालामाल

महत्वाचे म्हणजे, गेल्या 3 वर्षांत अर्थात मार्च 2021 नंतर, या स्टॉकने अनेक पटींनी परतावा दिला आहे. या कालावधीत, हा शेअर ₹ 1.83 वरून आताच्या किंमतीपर्यंत पोहोचला आहे. म्हणजेच 3133 टक्क्यांनी वधारला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 06:21 PM2024-04-11T18:21:33+5:302024-04-11T18:21:57+5:30

महत्वाचे म्हणजे, गेल्या 3 वर्षांत अर्थात मार्च 2021 नंतर, या स्टॉकने अनेक पटींनी परतावा दिला आहे. या कालावधीत, हा शेअर ₹ 1.83 वरून आताच्या किंमतीपर्यंत पोहोचला आहे. म्हणजेच 3133 टक्क्यांनी वधारला आहे.

share market cinerad communications share jump from rs 2 to rs59 delivered 2051 percent just in 1 year | याला म्हणतात धमाका! ₹2 चा शेअर ₹59 वर आला, एका वर्षात 2051% परतावा दिला; 6 महिन्यांपासून करतोय मालामाल

याला म्हणतात धमाका! ₹2 चा शेअर ₹59 वर आला, एका वर्षात 2051% परतावा दिला; 6 महिन्यांपासून करतोय मालामाल

शेअर बाजारात सिनेरॅड कम्युनिकेशन्स (CINC) च्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या एका वर्षात मल्टीबॅगर परतावा दिला आहे. या शेअरने गेल्या एका वर्षात 2,051.64% एवढा मल्टीबॅगर परतावा दिला आहे. या कालावधीत या शेअरची किंमत 2 रुपयांवरून 59.17 रुपयांवर पोहोचली आहे. या शेअरला बुधवारी 2% चे अप्पर सर्किटला लागले होते आणि तो 59.17 रुपयांच्या 52 आठवड्यांचा उच्चांकावर पोहोचला होता. महत्वाचे म्हणजे, गेल्या 3 वर्षांत अर्थात मार्च 2021 नंतर, या स्टॉकने अनेक पटींनी परतावा दिला आहे. या कालावधीत, हा शेअर ₹ 1.83 वरून आताच्या किंमतीपर्यंत पोहोचला आहे. म्हणजेच 3133 टक्क्यांनी वधारला आहे.

सातत्याने देतोय बंपर परतावा -
सिनेरॅड कम्युनिकेशन्सच्या शेअरने या वर्षात आतापर्यंतच्या 4 ही महिन्यांत सकारात्मक परतावा दिला असून तो 276 टक्के वधारला आहे. गेल्या नोव्हेंबर 2023 पासून ते आतापर्यंत सलग सहाव्या महिन्यात या शेअरमध्ये देजी दिसून येत आहे. या महिन्यात आतापर्यंत या शेअरमध्ये 17 टक्क्यांहून अधिक तेजी आली आहे. नोव्हेंबर 2023 आणि एप्रिल 2024 दरम्यान, या स्टॉकमध्ये 916 टक्क्यांहून अधिकची तेजी आली आहे. दरम्यान, हा शेअर मार्च 2024 मध्ये 41 टक्के, फेब्रुवारी आणि जानेवारी महिन्यात 51 टक्क्यांनी वधारला आहे. हा शेअर 10 एप्रिल, 2024 रोजी ₹59.17 च्या आपल्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला होता. हा शेअर आता 31 मे, 2023 च्या आपल्या ₹1.99 या नीचांकाच्या तुलनेत 2,873 टक्क्यांहून अधिक वधारला आहे.

सिनेराड कम्युनिकेशन्स लिमिटेड भारतात जाहिरात आणि प्रमोशनल फिल्म्स आणि फीचर फिल्म्सच्या निर्मितीमध्ये सक्रिय आहे. ही कंपनी डिजिटल व्हिडिओ संपादन आणि संगणक ग्राफिक्स देखील पुरवते. तसेच शूटिंगसाठी स्टुडिओ आणि HD कॅमेरेही भाड्याने देते. याशिवाय, ही कंपनी टीव्ही सीरियल्स आणि रिॲलिटी शो देखील करते. कंपनीची स्थापना 1986 मध्ये झाली असून कोलकातील आहे.

Web Title: share market cinerad communications share jump from rs 2 to rs59 delivered 2051 percent just in 1 year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.