Share Market : गेल्या काही महिन्यांपासून भारतीय शेअर बाजाराला परकीय लोकांचा ग्रहण लागलं आहे. ऑक्टोबरपासून परकीय गुंतवणूकदारांची सातत्याने विक्री सुरू असल्याने बाजार नीचांकी पातळीवर चालला आहे. अशा परिस्थिती डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्काची त्यात भर पडली. हे सर्व कमी होतं की काय म्हणून आज इलॉन मस्क यांची टेस्ला कंपनी भारतात येण्याच्या बातम्यांनी राहिलेली कसरही भरुन काढली आहे. या अर्थ परकीय गोष्टींचा मोठा प्रभाव बाजारावर पाहायला मिळत आहे. सप्ताहाच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशीही शेअर बाजार घसरणीसह बंद झाला.
कोणत्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण?
निफ्टी पॅक शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण महिंद्रा अँड महिंद्रामध्ये ६.२० टक्के, अदानी पोर्ट्समध्ये २.६७ टक्के, बीपीसीएलमध्ये २.६७ टक्के, टाटा मोटर्समध्ये २.५२ टक्के आणि अदानी एंटरप्रायझेसमध्ये २.४८ टक्के झाली. तर हिंदाल्कोमध्ये सर्वाधिक २.०९ टक्के, टाटा स्टीलमध्ये १.८५ टक्के, आयशर मोटर्समध्ये १.६३ टक्के, लार्सन अँड टुब्रोमध्ये १.२१ टक्के आणि एसबीआय लाईफमध्ये ०.७३ टक्के वाढ नोंदवण्यात आली.
ऑटो सेक्टरला मोठा धक्का
क्षेत्रीय निर्देशांकांबद्दल बोलायचे झाल्यास, निफ्टी ऑटोमध्ये २.५८ टक्के, निफ्टी मिडस्मॉल आयटी आणि टेलिकॉममध्ये २.२१ टक्के, निफ्टी मिडस्मॉल फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये १.०२ टक्के, निफ्टी ऑइल अँड गॅसमध्ये १.०५ टक्के, निफ्टी कन्झ्युमर ड्युरेबल्समध्ये १.०५ टक्क्यांनी घसरण झाली. निफ्टी हेल्थकेअर इंडेक्समध्ये १.९३ टक्के, निफ्टी रियल्टीमध्ये १.२७ टक्के, निफ्टी प्रायव्हेट बँकेत ०.७४ टक्के, निफ्टी पीएसयू बँकेत १.३४ टक्के, निफ्टी फार्मामध्ये १.९२ टक्के, निफ्टी मीडियामध्ये १.१७ टक्के, निफ्टी आयटीमध्ये ०.७९ टक्के, निफ्टी एमसीमध्ये ०.४६ टक्के, निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेस ०.४६ टक्के आणि निफ्टी बँक ०.६७२ टक्के नोंदवले गेले. याशिवाय निफ्टी मेटलने १.०२ टक्क्यांची वाढ नोंदवली.