Join us

शेअर बाजार सपाट बंद! एशियन पेंट्ससह दिग्गज कंपन्यांना धक्का; 'या' क्षेत्रात तुफान तेजी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 4:09 PM

Stock Markets : सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात मोठा चढउतार पाहायला मिळाला. अखेरी बाजार फ्लॅट होऊन बंद झाला.

Share Market : गेल्या महिन्याभरापासून भारतीय शेअर बाजारात मोठी अस्थिरता पाहायला मिळत आहे. आज आठवड्याची सुरुवातही शेअर बाजारात घसरणीने झाली. सेन्सेक्स ४०० अंकांच्या घसरणीसह तर निफ्टी १०० हून अधिक अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत होता. त्याचवेळी बँक निफ्टीही जवळपास २५० अंकांच्या घसरणीत होता. मिडकॅप निर्देशांकातही विक्री दिसून आली. निर्देशांक ४०० हून अधिक अंकांनी खाली आला. यानंतर बाजाराने चांगली रिकव्हरी दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र, यानंतर निर्देशांक पुन्हा घसरल्याचे दिसून आले.

सेन्सेक्समधील १८ कंपन्यांचे शेअर्स लाल रंगात बंदसोमवारी सेन्सेक्समधील ३० पैकी १८ कंपन्यांचे शेअर्स लाल तर उर्वरित १२ कंपन्यांचे शेअर्स हिरव्या रंगात बंद झाले. निफ्टी ५० मधील ५० पैकी ३० कंपन्यांचे शेअर्स नुकसानासह लाल तर १९ कंपन्यांचे शेअर्स नफ्यासह हिरव्या रंगात बंद झाले. तर एका कंपनीचे शेअर्स कोणताही बदल न करता बंद झाले.

एशियन पेंट्सच्या शेअर्समध्ये मोठी घसरणसेन्सेक्स कंपन्यांमध्ये समावेश असलेल्या एशियन पेंट्सच्या शेअर्समध्ये आज सर्वात मोठी ८.१८ टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. टाटा स्टील १.७६ टक्के, बजाज फायनान्स १.७३ टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा १.६५ टक्के, जेएसडब्ल्यू स्टील १.६४ टक्के, एनटीपीसी १.३२ टक्के, अदानी पोर्ट्स १.१७ टक्के, बजाज फिनवर्स १.१५ टक्के घसरुन बंद झाले.

याव्यतिरिक्त लार्सन अँड टुब्रो, सन फार्मा, रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदुस्थान युनिलिव्हर, भारती एअरटेल, नेस्ले इंडिया, अल्ट्राटेक सिमेंट, आयटीसी, कोटक महिंद्रा बँक आणि टाटा मोटर्सचे समभागही घसरणीसह लाल रंगात बंद झाले.

पॉवर ग्रिडच्या शेअर्समध्ये मोठी वाढपॉवरग्रिडचे शेअर्स आज सर्वाधिक ४.२२ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. एचसीएल टेक १.६० टक्के, इन्फोसिस १.५८ टक्के, टेक महिंद्रा १.२४ टक्के, टीसीएस १.२१ टक्के, मारुती सुझुकी ०.८६ टक्के, आयसीआयसीआय बँक ०.७८ टक्के, एचडीएफसी बँक ०.६९ टक्के, टायटन ०.६४ टक्के, इंडसइंड बँक ०.६४ टक्के, भारतीय स्टेट बँक ०.५४ टक्के आणि एक्सिस बँकचे शेअर्स ०.४४ टक्क्याच्या वाढीसह हिरव्या रंगात बंद झाले.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक