Stock Market : भारतीय शेअर बाजारात आज पुन्हा एकदा चांगली रिकव्हरी पाहायला मिळाली. बुधवारी (२७ नोव्हेंबर) सकाळी शेअर बाजाराची सपाट सुरुवात झाली. मात्र, नंतर अनेक श्रेणीतील चांगले व्यवहार झाल्याने वाढीसह बंद झाला. खालच्या स्तरावरून उत्कृष्ट रिकव्हरीसह बाजार हिरव्या रंगात बंद झाले. निफ्टी ८० अंकांनी वाढून २४,२७४ वर बंद झाला. सेन्सेक्स २३० अंकांनी वाढून ८०,२३४ वर बंद झाला आणि निफ्टी बँक ११० अंकांनी वाढून ५२,३०१ वर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात आज चांगली खरेदी दिसून आली.
निफ्टीचे ५० च्या शेअर्सची काय स्थिती?
आज आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी सेन्सेक्समधील ३० कंपन्यांपैकी १६ कंपन्यांचे शेअर्स वाढीसह हिरव्या रंगात बंद झाले. तर उर्वरित १४ कंपन्यांचे शेअर्स नुकसानासह लाल रंगात बंद झाले. त्याचप्रमाणे निफ्टी ५० मधील ५० पैकी २५ कंपन्यांचे शेअर्स वाढीसह हिरव्या रंगात बंद झाले. उर्वरित २५ कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह लाल रंगात बंद झाले.
अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये तुफान वाढ
सेन्सेक्स कंपन्यांमध्ये समाविष्ट असलेल्या अदानी पोर्ट्सचे शेअर्स आज सर्वाधिक ५.९१ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. एनटीपीसी २.३१ टक्के, एचडीएफसी बँक १.३८ टक्के, बजाज फायनान्स १.३१ टक्के, मारुती सुझुकी १.२४ टक्के, जेएसडब्ल्यू स्टील ०.७४ टक्के, ॲक्सिस बँक ०.५३ टक्के, टेक महिंद्रा ०.४९ टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा ०.३७ टक्के, बजाज फिनसर्व्ह ०.३५ टक्के, हिंदुस्तान युनिलिव्हर ०.३१ टक्के, नेस्ले इंडिया ०.२८ टक्के, अल्ट्राटेक सिमेंट ०.२३ टक्के, टाटा मोटर्स ०.२२ टक्के, इन्फोसिस ९.२१ टक्के आणि टाटा स्टील ०.११ टक्केवारीच्या वाढीसह बंद झाले.
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण
दुसरीकडे, टायटनचा शेअर्स आज कमाल ०.७७ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. स्टेट बँक ०.५७ टक्के, एशियन पेंट्स ०.५४ टक्के, टीसीएस ०.४७ टक्के, सन फार्मा ०.४१ टक्के, इंडसइंड बँक ०.३९ टक्के, एचसीएल टेक ०.२४ टक्के, आयसीआयसीआय बँकेचे समभाग ०.२४ टक्के, कोटक महिंद्रा बँक ०.१९ टक्के, पॉवरग्रिड ०.१२ टक्के, लार्सन अँड टुब्रो ०.०९ टक्के, रिलायन्स इंडस्ट्रीज ०.०८ टक्के, आयटीसी ०.०६ टक्के आणि भारती एअरटेलचे ०.०२ टक्क्यांनी घसरले.