Join us

बाजार पुन्हा रेड झोनमध्ये; 'या' खासगी बँकांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण, कोणत्या सेक्टरमध्ये वाढ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 16:35 IST

Share Market : शुक्रवारी शेअर बाजाराची चांगली सुरुवात झाली. मात्र, दुपारनंतर बाजार वेगाने खाली आला. आजच्या व्यवहारादरम्यान, सेन्सेक्स ७७,७६६.७० अंकांच्या इंट्राडे उच्चांकावरून ७७,१८५.६२ अंकांच्या इंट्राडे नीचांकापर्यंत पोहोचला.

Share Market : गेल्या आठवड्यात चांगली वाढ झाल्यानंतर बाजारात रिकव्हरी परतली असेच सर्वांना वाटत होतं. मात्र, बाजार पुन्हा अस्थिर झाला आहे. आज पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. शुक्रवारी, आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, बीएसई सेन्सेक्स १९१.५१ अंकांच्या घसरणीसह ७७,४१४.९२ अंकांवर बंद झाला. तर NSE चा निफ्टी ५० निर्देशांक ७२.६० अंकांनी घसरून २३,५१९.३५ अंकांवर बंद झाला. आज बाजाराने व्यवहारात चांगली सुरुवात केली होती. पण काही काळानंतर त्यात मोठे चढ-उतार येऊ लागले.

इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये मोठी घसरणशुक्रवारी सेन्सेक्समधील ३० कंपन्यांपैकी केवळ १० कंपन्यांचे शेअर्स वाढीसह हिरव्या रंगात बंद झाले. तर उर्वरित २० कंपन्यांचे समभाग नुकसानासह लाल रंगात बंद झाले. दुसरीकडे, निफ्टी ५० मधील ५० पैकी १९ कंपन्यांचे समभाग वाढीसह हिरव्या रंगात बंद झाले आणि उर्वरित ३१ कंपन्यांचे समभाग नुकसानासह लाल रंगात बंद झाले. आज सेन्सेक्स कंपन्यांमध्ये कोटक महिंद्रा बँकेचे समभाग सर्वाधिक १.७८ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले, तर इंडसइंड बँकेचे समभाग सर्वाधिक ३.५० टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.    महिंद्रा, झोमॅटो, एचसीएलच्या शेअर्सला मोठा धक्काशुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्समधील इतर कंपन्यांमध्ये हिंदुस्थान युनिलिव्हर ०.९५ टक्के, भारती एअरटेल ०.७९ टक्के, नेस्ले इंडिया ०.७५ टक्के, आयसीआयसीआय बँक ०.७३ टक्के, टाटा मोटर्सचे शेअर्स ०.६६ टक्के, आयटीसी ०.२० टक्के, एचडीएफसी बँक ०.०८ टक्के, ॲक्सिस बँक ०.०८ टक्के आणि सन फार्मा ०.०६ टक्के वाढीसह बंद झाले. दुसरीकडे, महिंद्रा अँड महिंद्राचे समभाग आज २.५८ टक्के, झोमॅटो २.२१ टक्के, एचसीएल टेक २.२० टक्के, इन्फोसिसचे समभाग २.१२ टक्के, मारुती सुझुकी २.१० टक्के, पॉवरग्रिड १.५६ टक्के, अदानी पोर्टस् १.५० टक्के, टीसीएस १.२८ टक्के, अल्ट्राटेक सिमेंट ०.९० टक्के आणि टाटा स्टील ४ टक्क्यांनी घसरले. 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारनिर्देशांकनिफ्टीगुंतवणूक