Lokmat Money >शेअर बाजार > 'या' सरकारी बँकेने राखली लाज; शेअर बाजार पुन्हा लाल रंगात बंद; सेन्सेक्स ७३,००० च्या खाली

'या' सरकारी बँकेने राखली लाज; शेअर बाजार पुन्हा लाल रंगात बंद; सेन्सेक्स ७३,००० च्या खाली

Share Market : आजच्या व्यवहारादरम्यान सेन्सेक्स ९ महिन्यातील नीचांकी पातळीवर घसरला होता. दुसरीकडे, निफ्टी ५० देखील २२,००० अंकांच्या खाली २१,९६४.६० अंकांवर घसरला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 16:15 IST2025-03-04T16:15:42+5:302025-03-04T16:15:42+5:30

Share Market : आजच्या व्यवहारादरम्यान सेन्सेक्स ९ महिन्यातील नीचांकी पातळीवर घसरला होता. दुसरीकडे, निफ्टी ५० देखील २२,००० अंकांच्या खाली २१,९६४.६० अंकांवर घसरला.

share market closing 4th march 2025 sensex fell by 96 points and nifty by 37 points 2025 | 'या' सरकारी बँकेने राखली लाज; शेअर बाजार पुन्हा लाल रंगात बंद; सेन्सेक्स ७३,००० च्या खाली

'या' सरकारी बँकेने राखली लाज; शेअर बाजार पुन्हा लाल रंगात बंद; सेन्सेक्स ७३,००० च्या खाली

Share Market : आठवड्याचे दुसरे सत्रही बाजारासाठी शुभ ठरले नाही. सुरुवातीच्या घसरणीनंतर बाजार तळातून सावरला खरा. पण, अखेरीस लाल रंगातच बंद झाला. मिडकॅप निर्देशांकही सपाट पातळीवर बंद झाला. तर स्मॉलकॅप इंडेक्स रिकव्हरीसह बंद झाले. जर आपण क्षेत्रीय आघाडीवर नजर टाकली तर पीएसई, ऊर्जा, तेल आणि वायू समभागांमध्ये खरेदी दिसून आली. निफ्टी बँक निर्देशांक वाढीने बंद झाला. तर ऑटो, आयटी, एफएमसीजी शेअर्समध्ये दबाव दिसून आला. मंगळवारी सेन्सेक्स आणि निफ्टीने ९ महिन्यांतील नीचांकी पातळी गाठली होती. अवघ्या ३ मिनिटांत गुंतवणूकदारांचे १.३३ लाख कोटी रुपये पाण्यात गेले.

या सरकारी बँकेमुळे रिकव्हरी
मंगळवारी सेन्सेक्समधील ३० कंपन्यांपैकी केवळ ११ कंपन्यांचे समभाग वाढीसह हिरव्या रंगात बंद झाले, तर उर्वरित सर्व १९ कंपन्यांचे समभाग घसरणीसह लाल रंगात बंद झाले. त्याचप्रमाणे निफ्टी ५० मधील ५० पैकी २२ कंपन्यांचे समभाग वाढीसह हिरव्या चिन्हात बंद झाले आणि उर्वरित २८ कंपन्यांचे समभाग लाल चिन्हात तोट्याने बंद झाले. आज सेन्सेक्स कंपन्यांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचे शेअर्स सर्वाधिक २.९८ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले, तर बजाज फिनसर्व्हचे शेअर्स सर्वाधिक २.७० टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.

या शेअर्समध्ये चढउतार
आज सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या इतर कंपन्यांमध्ये झोमॅटोचे समभाग २.२३ टक्के, टीसीएस १.०४ टक्के, एचडीएफसी बँक ०.७८ टक्के, आयसीआयसीआय बँक ०.६८ टक्के, पॉवरग्रीड ०.६७ टक्के, टाटा स्टील ०.६१ टक्के, अदानी पोर्ट्स ०.४० टक्के, लार्सन अँड टुब्रो ०.३५ टक्के, इंडसइंड बँकेचे समभाग ०.३४ टक्के आणि अल्ट्राटेक सिमेंटचे ०.३३ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. तर एचसीएल टेक २.४० टक्के, नेस्ले इंडिया १.८२ टक्के, एशियन पेंट्स १.७८ टक्के, इन्फोसिस १.४७ टक्के, सन फार्मा १.३७ टक्के, भारती एअरटेल १.१३ टक्के, हिंदुस्थान युनिलिव्हर १.१० टक्के, टायटन १.०९ टक्के, मारुती सुझुकी १.०८ टक्के, रिलायन्स ०.९२ टक्क्यांनी घसरले.

Web Title: share market closing 4th march 2025 sensex fell by 96 points and nifty by 37 points 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.