Join us

शेअर बाजारात शेवटच्या दिवशीही पडझड; गुंतवणूकदारांचे १७ लाख कोटी रुपये पाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2024 3:55 PM

Stock Market : भारतीय शेअर बाजारावर सलग तिसऱ्या दिवशी इराण आणि इस्रायल तणावाचा परिणाम पाहायला मिळाला. आजही ८०० अंकांनी घसरुन शेअर बाजार बंद झाला.

Stock Market : गेल्या २ आठवड्यात दमदार कामगिरी करणाऱ्या भारतीय शेअर बाजाराला मोठा ब्रेक लागला आहे. इराण आणि इस्रायलमध्ये युद्धाची ठिणगी पेटल्याने बाजारावर त्याचा नकारात्मक परिणाम झाला आहे. सलग तिसऱ्या दिवशी बाजारात पडझड पाहायला मिळाली. भारतीय शेअर बाजाराने शुक्रवारी (4 ऑक्टोबर) घसरणीसह व्यवहाराला सपाट सुरुवात केली. हिरव्या आणि लाल रंगामध्ये बाजार डोलताना दिसत होता. बँकिंग आणि आयटी शेअर्सने तारलं असलं तरी तेल कंपन्यांचे स्टॉक्स आपटलेले पाहायला मिळाले. दुसरीकडे आज बाजारात विक्रीचा दबाव पाहायला मिळाला.

आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात आणि सलग पाचव्या दिवशी भारतीय शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला. दिवसभर बाजारात प्रचंड अस्थिरता होती. सकाळी घसरणीसह बाजार उघडला पण दिवसभरात सेन्सेक्स ८७० अंकांनी तर निफ्टी २३५ अंकांनी वधारला. पण व्यवहार संपण्यापूर्वीच बाजारात पुन्हा जोरदार प्रॉफिट बुकींग आली आणि सेन्सेक्स दिवसाच्या उच्चांकावरून १८३५ पर्यंत घसरला. तर निफ्टी ५२० अंकांनी घसरुन बंद झाला. एफएमसीजी, बँकिंग आणि ऊर्जा शेअर्समध्ये झालेल्या विक्रीमुळे बाजारात ही घसरण झाली आहे.

गुंतवणूकदारांचे ३.७० लाख कोटी रुपयांचे नुकसानआजही बाजारात विक्रीमुळे गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. बीएसईवर लिस्टेड शेअर्सचे मार्केट कॅप घसरले आहे असून ते ४६१.०५ लाख कोटी रुपयांवर बंद झाले आहे, जे मागील सत्रात ४६५.०५ लाख कोटी रुपयांवर बंद झाले होते. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांचे ३.७० लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या आठवड्यात भारतीय शेअर बाजाराचे मार्केट कॅप १७ लाख कोटी रुपयांनी घसरले आहे.

या शेअर्समध्ये चढउतारबीएसईवर एकूण ४०५४ शेअर्सचे व्यवहार झाले, त्यापैकी १५३२ शेअर्स वाढीसह बंद झाले तर २३८६ शेअर्स तोट्यासह बंद झाले. सेन्सेक्समधील ३० शेअर्सपैकी ८ शेअर्स वाढीसह बंद झाले तर २२ शेअर्स तोट्यासह बंद झाले. निफ्टीच्या ५० शेअर्सपैकी १३ वाढीसह आणि ३७ तोट्यासह बंद झाले. वाढत्या शेअर्समध्ये इन्फोसिस १.३३ टक्के, टेक महिंद्रा ०.८३ टक्के, टाटा मोटर्स ०.५१ टक्के, ॲक्सिस बँक ०.५० टक्के, टीसीएस ०.४२ टक्के, एसबीआय ०.२८ टक्के, एचसीएल टेक ०.७२ टक्के वाढीसह बंद झाले. तर घसरलेल्या शेअर्समध्ये महिंद्रा अँड महिंद्रा ३.५८ टक्के, बजाज फायनान्स ३.०१ टक्के, नेस्ले 2.85 टक्के, एशियन पेंट्स २.४९ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक