Join us

Share Market Closing Today: ५ दिवसांची घसरण अखेर थांबली, सेन्सेक्स-निफ्टीमध्ये तेजी; IT, मेटल शेअर्समध्ये तेजी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 4:14 PM

Share Market Closing Today: सलग पाच दिवस सुरू असलेली शेअर बाजाराची घसरण अखेर शुक्रवारी थांबली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आज १,२९२.९२ अंकांच्या वाढीसह ८१,३३२.७२ वर बंद झाला

सलग पाच दिवस सुरू असलेली शेअर बाजाराची घसरण अखेर शुक्रवारी थांबली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आज १,२९२.९२ अंकांच्या किंवा १.६१% वाढीसह ८१,३३२.७२ वर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही जोरदार वाढ दिसून आली. निफ्टी आज ४३४.३१ म्हणजेच १.७८ टक्क्यांच्या वाढीसह २४,८४०.४० च्या पातळीवर बंद झाला. शुक्रवारी मेटल आणि आयटी क्षेत्रासह जवळपास सर्वच क्षेत्रांत तेजी दिसून आली.

आजच्या टॉप गेनर्सबद्दल बोलायचं झालं तर इंडिया अॅश्युरन्स कंपनीच्या शेअरमध्ये सर्वाधिक वाढ झाली असून, त्याचे शेअर्स ३३.३० रुपये म्हणजेच १२.८९ टक्क्यांच्या वाढीसह २९१.७३ रुपयांवर पोहोचले. तर जीआयसीच्या शेअर्समध्ये १०.३० टक्क्यांची वाढ झाली असून, ते ४१०.५० रुपयांवर बंद झाला . तर दुसरीकडे पेटीएमचे शेअर १० टक्क्यांच्या वाढीसह ५०९.०५ रुपयांवर आणि श्रीराम फायनान्सचा शेअर ९.१९ टक्क्यांनी वधारून २,९२५ रुपयांवर बंद झाला.

टॉप लूझर्स कोण?टॉप लूजर्सबद्दल बोलायचं झालं तर शुक्रवारी एमएमटीसीचे शेअर्स ११.६६ टक्क्यांच्या घसरणीनंतर १०६.८२ च्या पातळीवर बंद झाले, तर सायंटच्या शेअरमध्ये आज ५.५१ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली, त्यानंतर तो १,७८९.९० रुपयांवर बंद झाला. रूट मोबाइलचा शेअर ५ टक्क्यांनी घसरून १,६४२.३० च्या पातळीवर बंद झाला. याशिवाय मॅनकाइंड फार्माचा शेअर ४.१३ टक्क्यांनी घसरून २,०५५.९० च्या पातळीवर बंद झाला.

मेटलमध्ये ३ टक्क्यांची तेजी

निफ्टी मेटलमध्ये ३ टक्क्यांची तेजी दिसून आली असून त्यात अदानी एंटरप्रायझेस, वेदांता आणि टाटा स्टील यांचा समावेश आहे. तर इन्फोसिस, भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टीसीएस या कंपन्यांनी सेन्सेक्सच्या शेअर्समध्ये जवळपास ५०० अंकांचा वाटा उचलला. याशिवाय कोटक बँक, एल अँड टी, आयटीसी, एसबीआय, एचसीएल टेक आणि टाटा स्टील यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 

टॅग्स :शेअर बाजार