Join us  

Closing Bell Today: आयटी क्षेत्रात जोरदार विक्री; सेन्सेक्समध्ये २२३ अंकांची घसरण, निफ्टी १९४०० च्या खाली बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 4:11 PM

गेले दोन दिवस सुरू असलेल्या शेअर बाजाराच्या वाढीला बुधवारी ब्रेक लागला. आ

गेले दोन दिवस सुरू असलेल्या शेअर बाजाराच्या वाढीला बुधवारी ब्रेक लागला. आयटी क्षेत्रातील विक्रीमुळे देशांतर्गत शेअर बाजार आज घसरणीसह बंद झाले. बीएसई सेन्सेक्स 223.94 अंकांनी म्हणजेच 0.34 टक्क्यांच्या घसरणीसह 65,393.90 अंकांच्या पातळीवर बंद झाला. त्याचप्रमाणे, NSE निफ्टी 55.10 म्हणजेच 0.28 टक्क्यांच्या घसरणीसह 19,384.30 अंकांच्या पातळीवर बंद झाला. निफ्टीवर ओएनजीसीच्या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली.

यात सर्वाधिक घसरणसेन्सेक्सवर टाटा मोटर्स, इन्फोसिस आणि अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअर्समध्ये आज एका टक्क्याहून अधिक घसरण झाली. त्याचप्रमाणे एनटीपीसी, इंडसइंड बँक, लार्सन अँड टुब्रो, एचसीएल टेक, पॉवरग्रीड, मारुती आणि एचडीएफसीच्या शेअरमध्ये 0.50 टक्क्यांहून अधिक घसरण झाली. याशिवाय टाटा स्टील, भारती एअरटेल, टीसीएस, अॅक्सिस बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्येही घसरण दिसून आली.

या शेअर्समध्ये वाढसेन्सेक्सवर कोटक महिंद्रा बँक, एशियन पेंट्स, सन फार्मा, नेस्ले इंडिया, टायटन आणि एसबीआयचे शेअर्स वाढीसह बंद झाले.

रुपया 12 पैशांनी मजबूतअमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 12 पैशांनी मजबूत होऊन 82.24 च्या पातळीवर बंद झाला. मागील सत्रात डॉलरच्या तुलनेत रुपया 82.36 च्या पातळीवर होता.

टॅग्स :शेअर बाजार