Share Market Closing 3 May: शेअर बाजारातगुंतवणूक करणाऱ्यांसाठी शुक्रवारचा दिवस(3 मे, 2024) अत्यंत वाईट ठरला. सेन्सेक्स आणि निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स 732.96 अंकांनी घसरुन 73878.15 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 172.35 अंकांनी घसरुन 22475.85 अंकांवर बंद झाला. या घसरणीमुळे BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप सुमारे 4.25 लाख कोटी रुपयांनी कमी झाले. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, गुंतवणूकदारांना सुमारे 4.25 लाख कोटी रुपयांचा फटका बसला.
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
विशेष म्हणजे, फक्त भारतीय शेअर बाजार नाही, तर आशियातील सर्व शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण झाली. जपानचा निक्केई, चीनचा शांघाय कंपोझिट आणि दक्षिण कोरियाचा कोस्पीही कोसळला.
सकाळी वर गेलेला बाजार दुपारपर्यंत जोरदार आपटला
शेअर बाजाराची सुरुवात धमाकेदार झाली. सकाळी BSE सेन्सेक्स 406.71 अंकांच्या किंवा 0.55 टक्क्यांच्या वाढीसह 75,017 च्या पातळीवर उघडला, तर NSE निफ्टी 118.15 अंकांच्या किंवा 0.52 टक्क्यांच्या वाढीसह 22,766 अंकांवर उघडला. पण, दुपारपर्यंत यात मोठी घसरण झाली.
ओएनजीसी, आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स वधारले
ओएनजीसी, इन्फोसिस आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स किरकोळ वाढीसह बंद झाले, तर विप्रो, बीईएल, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचसीएल टेक, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेलच्या एशियन पेंट्स आणि लार्सन अँड टुब्रोचे शेअर्स घसरणीसह बंद झाले. त्याचा परिणाम संपूर्ण बाजारपेठेवर दिसून आला.
(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)
दुधाचे दात पडण्याआधी कॉम्प्युटर शिकले, शाळेत शिकताना बनले सर्वात तरुण सीईओ...