Share Market Closing : दिवसभरातील अस्थिरतेनंतर बुधवारी कामकाजाच्या अखेरिस भारतीय शेअर बाजार तेजीसह बंद झाला. एफएमसीजी, कन्झ्युमर ड्युरेबल्स आणि फार्मा सेक्टरच्या शेअर्सचा भारतीय बाजारातील या तेजीमध्ये मोठा वाटा आहे. मिडकॅप शेअर्समध्येही खरेदी दिसून आली आहे. आजच्या व्यवहाराअखेर बीएसई सेन्सेक्स १०२ अंकांनी वधारून ८०,९०५ वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७१ अंकांनी वधारून २४,७७० अंकांवर बंद झाला.
हे शेअर्स वधारले / घसरले
आजच्या व्यवहारात सेन्सेक्सच्या ३० पैकी १७ शेअर्स वधारले तर १३ घसरले. तर निफ्टीच्या ५० शेअर्सपैकी ३६ शेअर्स वधारले आणि १४ घसरले. टायटन २.३६ टक्के, एशियन पेंट्स १.५५ टक्के, हिंदुस्थान युनिलिव्हर १.४७ टक्के, आयटीसी १.२६ टक्के, नेस्ले १.१८ टक्के, भारती एअरटेल १.०८ टक्के, जेएसडब्ल्यू स्टील १.०४ टक्के, बजाज फिनसर्व्ह ०.९८ टक्के, अॅक्सिस बँक ०.६९ टक्के, अदानी पोर्ट्स ०.६८ टक्के, टीसीएस ०.६४ टक्क्यांनी वधारले. तर अल्ट्राटेक सिमेंट १.५१ टक्के, टाटा स्टील १.३० टक्के, टेक महिंद्रा १.२१ टक्के, पॉवर ग्रिड ०.९१ टक्के, एचडीएफसी बँक ०.७४ टक्क्यांनी घसरून बंद झाले.
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ
भारतीय शेअर बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत जोरदार वाढ झाली आहे. बीएसईवर लिस्टेड शेअर्सचं बाजार भांडवल ४५९.२७ लाख कोटी रुपयांवर बंद झालं, जे मागील सत्रात ४५६.८६ लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत २.४१ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.