Lokmat Money >शेअर बाजार > Stock Market Closing : शेअर बाजारात जोरदार प्रॉफिट बुकिंग, सेन्सेक्स ७९३ अंकांनी आपटला, निफ्टी २३४ अंकांनी घसरला

Stock Market Closing : शेअर बाजारात जोरदार प्रॉफिट बुकिंग, सेन्सेक्स ७९३ अंकांनी आपटला, निफ्टी २३४ अंकांनी घसरला

बँकिंग, एफएमसीजी आणि फार्मा शेअर्सच्या विक्रीमुळे बाजार घसरला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सनाही या घसरणीचा फटका बसला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 03:51 PM2024-04-12T15:51:01+5:302024-04-12T15:51:14+5:30

बँकिंग, एफएमसीजी आणि फार्मा शेअर्सच्या विक्रीमुळे बाजार घसरला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सनाही या घसरणीचा फटका बसला आहे. 

share Market Closing Strong profit booking in stock market Sensex falls by 793 points Nifty falls by 234 points | Stock Market Closing : शेअर बाजारात जोरदार प्रॉफिट बुकिंग, सेन्सेक्स ७९३ अंकांनी आपटला, निफ्टी २३४ अंकांनी घसरला

Stock Market Closing : शेअर बाजारात जोरदार प्रॉफिट बुकिंग, सेन्सेक्स ७९३ अंकांनी आपटला, निफ्टी २३४ अंकांनी घसरला

Stock Market Closing On 12 April 2024: कामकाजादरम्यान झालेल्या मोठ्या प्रॉफिट बुकिंगमुळे शेअर बाजार शुक्रवारी मोठ्या घसरणीसह बंद झाला. बँकिंग, एफएमसीजी आणि फार्मा शेअर्सच्या विक्रीमुळे बाजार घसरला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सनाही या घसरणीचा फटका बसला आहे. 
 

कामकाजाच्या अखेरिस बीएसई सेन्सेक्स 793 अंकांनी घसरून 74,245 अंकांवर बंद झाला आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 234 अंकांनी घसरून 22,519 अंकांवर बंद झाला. बाजारातील ही घसरण अमेरिकेतील महागाई दरात झालेली वाढ आणि वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्यामुळे झाली आहे.  
 

दुपारनंतर शेअर बाजारातील तीव्र घसरणीचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला. बँकिंग, ऑटो, आयटी, फार्मा, एफएमसीजी, मेटल, रिअल इस्टेट, मीडिया, पॉवर, इन्फ्रा, ऑईल अँड गॅस, कंझ्युमर ड्युरेबल आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील शेअर्स मोठ्या घसरणीसह बंद झाले. आजच्या व्यवहारात मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 
 

400 लाख कोटींच्या खाली मार्केट कॅप
 

शेअर बाजारातील घसरणीमुळे शेअर बाजाराच्या मार्केट कॅपमध्ये घट झाली आहे. बीएसईच्या आकडेवारीनुसार, एक्सचेंजवर लिस्टेड शेअर्सचे मार्केट कॅप 400 लाख कोटी रुपयांच्या खाली घसरून 399.76 लाख कोटी रुपये झाले आहे, जे गेल्या ट्रेडिंग सत्रात 402.16 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या सत्रात मार्केट कॅप 2.40 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. 

Web Title: share Market Closing Strong profit booking in stock market Sensex falls by 793 points Nifty falls by 234 points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.