गुड्स ट्रेडिंगच्या बिझनेसशी संबंधित एका स्मॉलकॅप कंपनीच्या शेअरने गेल्या काही दिवसांत जबरदस्त परतावा दिला आहे. या कंपनीचे नाव आहे कम्फर्ट इनटेक लिमिटेड. या कंपनीचा शेअर गेल्या 3 वर्षांपेक्षाही कमी कालावधीत 2 रुपयांवरून 28 रुपयांवर पोहोचला आहे. कम्फर्ट इनटेकचा शेअर या कालावधी आपल्या गुंतवणूकदारांना 1100 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. याच बरोबर आता कंपनी आपले शेअर्स वाटण्याच्या तयारीत आहे. कम्फर्ट इनटेक, सर्व प्रकारच्या स्पिरिट्सच्या बिझनेसमध्येही आहे. कंपनीचे मार्केट व्हॅल्यूएशन 90.70 कोटी रुपये एवढे आहे.
10 फेब्रुवारीला होणार कंपनीची बोर्ड मिटिंग -
कंपनीने स्टॉक एक्सचेन्ज फायलिंगमध्ये सांगितले की, 'कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक शुक्रवारी 10 फेब्रुवारी 2023 ला होणार आहे. या बैठकीत 31 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाहीसंदर्भात आणि नऊ महिन्यांच्या अन-ऑडिटेड स्टँडअलोन आणि कंसॉलिडेटेड फायनांशिअल रिझल्ट्सवर विचार होईल. तसेच, ते अप्रूव्हदेखील केले जाईल. याशिवाय, कंपनी 10 रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या सध्याच्या इक्विटी शेअर्सच्या सब-डिव्हिजन/स्टॉक स्प्लिटवरही विचार करेल.'
2.32 रुपयांवरून 28 रुपयांच्या पार गेला शेअर -
कम्फर्ट इनटेक लिमिटेडचा शेअर 3 एप्रिल 2020 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेन्जवर (BSE) 2.32 रुपयांवर होता. तो 24 जानेवारी 2023 रोजी बीएसईवर 28.35 रुपयांच्या पातळीवर पोहोचला. या काळात या शेअरने गुंतवणूकदारांना तब्बल 1121 टक्क्यांचा परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने 3 एप्रिल 2020 रोजी या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आत त्याचे 12.21 लाख रुपये झाले असते. या शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक 31.65 रुपये एढा आहे. तर निचांकी पातळी 19.80 रुपये एवढी आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)