शेअर बाजार आठवड्याच्या अखेरच्या दिवशी कोसळला आहे. गुंतवणूकदारांनी नफा मिळविण्यासाठी विक्रीचा सपाटा लावल्याने बीएसईचा ३० सेअर्सचा सेन्सेक्स ९०० अंकांनी कोसळला. तर निफ्टी देखील २०० अंकांनी कोसळून 17,400 च्या खाली व्यवहार करत आहे.
असे असले तरी अदानींचे शेअर्स रॉकेट बनले आहेत. या घसरणीचा एकाच कंपनीला धक्का बसला आहे. शुक्रवारी शेअर बाजाराची सुरुवात लाल रंगात झाली. बाजार सुरु होताच सेन्सेक्स आणि निफ्टी धडाधड कोसळले. सेंसेक्स 903.95 अंकांनी कोसळून 58,907.18 वर आला. तर एनएसईचा निफ्टी 259.75 अंकांनी कोसळला होता.
सध्या सेंसेक्स 658.87 अंकांनी कोसळलेला असून निफ्टी 173.95 अकांनी कोसळलेला आहे. गुरुवारी देखील शेअर बाजार घसरण सुरु असतानाच बंद झाला होता. यामुळे आज गुंतवणूकदार शेअर्सची मोठ्या संख्येने विक्री करतील असा अंदाज होता.
अदानी एंटरप्रायजेसचा शेअर 3.74 टक्क्यांनी कोसळला आहे. हा शेअर 1,933.4 वर ट्रेंड करत आहे. HDFC Bank Limited चा देखील शेअर 35.20 रुपयांनी घसरून 1,595.50 वर ट्रेंड करत आहे. अदानीची ही एक कंपनी वगळता अन्य कंपन्या हिरव्या रंगात व्यवहार करत आहेत.