शेअर बाजारात ऐतिहासिक तेजी दिसत असताना आठवड्याच्या पहिल्याच व्यवहाराच्या दिवशी अर्थात सोमवारी काही पेनी स्टॉक्सना जबरदस्त मागणी होती. असाच एक पेनी स्टॉक म्हणजे, क्यूबिकल फायनान्शियल सर्व्हिसेसचा आहे. ट्रेडिंग दरम्यान या स्टॉक मध्ये अपर सर्किट लागले आहे. महत्वाचे म्हणजे, क्यूबिकल फायनान्शियल सर्व्हिसेस, ही नॉन बँकिंग फायन्स सेक्टरशी संबंधित कंपनी आहे.
शेअरची किंमत -
हा शेअर सोमवारी यापल्या 1.69 रुपयांच्या बंद किंमतीपासून 20 टक्क्यांनी वाढून 2.02 रुपयांवर पोहोचला. हा शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक आहे. या शेअरने 2024 मध्ये 30 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. मात्र, दीर्घ कालावधित या शेअरने गुंतवणूकदारांना निगेटिव्ह परतावा दिला आहे. 10 वर्षांच्या कालावधीचा विचार करता, गुंतवणूकदारांना 80 टक्क्यांपर्यंत नुकसान सोसावे लागले आहे. 2014 मध्ये या शेअरची किंमत 23 रुपयांपेक्षा जास्त होती.
शेअरहोल्डिंग पॅटर्न -
या कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नचा विचार करता, 30.80 टक्के वाटा हा प्रमोटर्सकडे आहे. तर 69.20 टक्के वाटा हा पब्लिक शेअरहोल्डर्सकडे आहे. प्रमोटर्समध्ये दोन इंडिव्हिज्युअल्स-अश्वनी आणि रीता गुप्ता हे आहेत. यांच्याकडे एकूण 2,00,75,137 शेअर आहेत. हे आकडे, सप्टेंबर तिमाही पर्यंतचे आहेत. ही कंपनी 1990 मध्ये सुरू झाली. हिचा कारभार फायनान्शियल सर्व्हिसेसशी संबंधित आहे. या कंपनीचे रजिस्टर्ड ऑफिस दिल्लीमध्ये आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)