Lokmat Money >शेअर बाजार > Israel-Hamas युद्धामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान, 4 लाख कोटी बुडाले

Israel-Hamas युद्धामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान, 4 लाख कोटी बुडाले

Share Market Update: इस्रायल आणि हमासमध्ये सुरू झालेल्या युद्धाचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर पडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2023 04:28 PM2023-10-09T16:28:36+5:302023-10-09T16:28:58+5:30

Share Market Update: इस्रायल आणि हमासमध्ये सुरू झालेल्या युद्धाचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर पडला.

Share Market: Due to the war between Israel and Hamas, investors in the stock market suffered a huge loss of Rs 4 lakh crore | Israel-Hamas युद्धामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान, 4 लाख कोटी बुडाले

Israel-Hamas युद्धामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान, 4 लाख कोटी बुडाले

Share Market Update: इस्रायल आणि हमास, यांच्यात सुरू झालेल्या युद्धाचा परिणाम भारतीयशेअर बाजारावर दिसला. सोमवारी(दि.9) सेन्सेक्स 484 अंकांच्या घसरणीसह बंद झाला, तर निफ्टी 19,500 अंकांनी कोसळली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही 1% पेक्षा जास्त घसरण झाली. बीएसईचे सर्व निर्देशांकही रेड झोनवर बंद झाले. या मोठ्या घसरणीमुळे आज शेअर गुंतवणूकदारांचे सुमारे 4 लाख कोटी बुडाले.

गुंतवणूकदारांचे 3.92 लाख कोटी बुडाले
BSE वर लिस्टेड कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप 315.94 लाख कोटी रुपयांनी घसरले. मागील ट्रेडिंग दिवशी, म्हणजे शुक्रवारी मार्केट कॅप 319.86 लाख कोटी रुपये होते. अशा प्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 3.92 लाख कोटी रुपयांनी कमी झाले. किंवा दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 3.92 लाख कोटी रुपयांची घट झाली.

सेन्सेक्सचे सर्वाधिक घसरलेले शेअर्स
आज सेन्सेक्समधील 30 पैकी केवळ 3 शेअर्स वाढीसह बंद झाले. यामध्ये एचसीएल टेकच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 1.02 टक्के वाढ झाली. याशिवाय TCS आणि हिंदुस्तान युनिलिव्हरचे शेअर्स अनुक्रमे 0.36% आणि 0.32% च्या वाढीसह बंद झाले. तर, उर्वरित 27 शेअर्स रेड लाईनवर बंद झाले. यापैकी टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 2.07 टक्क्यांची घसरण दिसली. याशिवाय महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज फायनान्स, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एशियन पेंट्सच्या शेअर्समध्ये 1.36 ते 2.05 टक्क्यांची घसरण दिसून आली.

Web Title: Share Market: Due to the war between Israel and Hamas, investors in the stock market suffered a huge loss of Rs 4 lakh crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.