Join us

Share Market : आधी घसरण मग तेजी, शेअर बाजारात चढ-उतार सुरुच; बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी वधारले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 9:57 AM

Share Market :आजही बाजार घसरणीसह उघडला. मात्र, उघडल्यानंतर तो पुन्हा ग्रीन झोनमध्ये गेला.

शेअर बाजारात सातत्यानं होत असलेली मोठी घसरण थांबण्याचं नाव घेत नाही. आजही बाजार घसरणीसह उघडला. मात्र, उघडल्यानंतर तो पुन्हा ग्रीन झोनमध्ये गेला. बीएसई सेन्सेक्स १२१.८९ अंकांनी वधारून ८०,३५९.८७ अंकांवर व्यवहार करत होता. तर एनएसई निफ्टी ३१.१० अंकांनी वधारून २४,५०३.२० अंकांवर व्यवहार करत होता. 

सेन्सेक्समधील शेअर्सचा विचार करता बजाज फायनान्स, बजाज फिन, टाटा स्टील, एचडीएफसी बँक, टीसीएस, इन्फोसिस, जेएसडब्ल्यूस्टील, अदानी पोर्ट्स, एचसीएल टेक, भारती एअरटेल आणि नेस्ले इंडिया या शेअर्समध्ये चांगली तेजी दिसून येत आहे.

बीएसई सेन्सेक्स २९९.५९ अंकांच्या वाढीसह ७९,९२१ वर तर एनएसई निफ्टी ९३.९५ अंकांच्या वाढीसह २४,३७८ वर व्यवहार खुला झाला. मात्र या घसरणीनंतर शेअर बाजारात तेजी परतली.

बजाजच्या शेअर्समध्ये तेजी

निफ्टी शेअर्समध्ये बजाज फायनान्सने चांगली ओपनिंग दाखवली असून यात ३.६७ टक्क्यांनी वाढ झाली. तर दुसरीकडे बजाज फिनसर्व्ह आणि बजाज ऑटो सारख्या समूहातील शेअर्सही जबरदस्त तेजीसह व्यवहार करत आहेत.

टॅग्स :शेअर बाजार