Lokmat Money >शेअर बाजार > शेअर असावा तर असा...! ₹1 लाखाचे केले ₹3 कोटी; तुम्हाला माहीत आहे नाव? 7 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट!

शेअर असावा तर असा...! ₹1 लाखाचे केले ₹3 कोटी; तुम्हाला माहीत आहे नाव? 7 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट!

या इंफ्रास्ट्रक्चर स्टॉकने गेल्या केवळ 5 वर्षांतच मल्टीबॅगर परतावा देत आपल्या गुंतवणूकदारांना कोट्यधीश केले आहे...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 08:13 PM2024-04-09T20:13:10+5:302024-04-09T20:14:13+5:30

या इंफ्रास्ट्रक्चर स्टॉकने गेल्या केवळ 5 वर्षांतच मल्टीबॅगर परतावा देत आपल्या गुंतवणूकदारांना कोट्यधीश केले आहे...

share market hazoor multi project share turn 1 lakh rupee in to rs 3 crore in just five years Upper circuit has been taking for 7 days | शेअर असावा तर असा...! ₹1 लाखाचे केले ₹3 कोटी; तुम्हाला माहीत आहे नाव? 7 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट!

शेअर असावा तर असा...! ₹1 लाखाचे केले ₹3 कोटी; तुम्हाला माहीत आहे नाव? 7 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट!

शेअर बाजार म्हणजे अनिश्चिततेचा आणि जोखमीचा खेळ. मात्र, यात गुंतवणूक करणाऱ्याना, एखादवेळी, एखादा शेअर असा लागतो की, जो त्यांच्या नशीबाचा पेटाराच उघडतो. यांपैकी काही शेअर्स दीर्घ काळात मल्टीबॅगर परतावा देणारे असतात. तर काही कमी कालावधीतच आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल करतात. असाच एक शेअर आहे इंफ्रास्ट्रक्चर अँड रियल एस्टेट कंपनी 'हजूर मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेड'चा (Hazoor Multi Projects Share) यात शेअरमध्ये गुंतवणूक करणारे लोक केवळ 5 वर्षांतच कोट्यधीश बनले आहेत.

1 रुपये के शेयर का भाव 405 के पार 
हजूर मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेडच्या शेअरसंदर्भात बोलायचे झाल्यास, या इंफ्रास्ट्रक्चर स्टॉकने गेल्या केवळ 5 वर्षांतच मल्टीबॅगर परतावा देत आपल्या गुंतवणूकदारांना कोट्यधीश केले आहे. या शेअरमध्ये एप्रिल 2019 मध्ये केवळ 1 लाख रुपयांची गुतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना रक्कम आता 3.5 कोटींच्या जवळपास केली आहे. 

खरे तर, हजूर मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेडचा शेअर 12 एप्रिल 2019 रोजी केवळ 1.13 रुपयांवर होता. जो मंगळवारी 405.05 रुपयांवर पोहोचला आहे. या हिशेबाने 5 वर्षांच्या कालावधीत या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 35,745.13 टक्क्यांचा परतावा दिल आहे.

सात दिवसांपासून अप्पर सर्किट -
हजूर मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेडचा शेअर मंगळवारी 9 एप्रिल 2024 ला शेअर बाजार बंद झाला तेव्हा 4.99 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह बंद झाला. या शेअरला गेल्या सात दिवसांपासून सातत्याने अप्पर सर्किट लागत आहे. या दरम्यान शेअरमध्ये जवळपास 40 टक्क्यांची तेजी आली आहे. गेल्या 28 मार्चला या शेअरची किंमत 288 रुपये होती.

Web Title: share market hazoor multi project share turn 1 lakh rupee in to rs 3 crore in just five years Upper circuit has been taking for 7 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.