Join us  

शेअर असावा तर असा...! ₹1 लाखाचे केले ₹3 कोटी; तुम्हाला माहीत आहे नाव? 7 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2024 8:13 PM

या इंफ्रास्ट्रक्चर स्टॉकने गेल्या केवळ 5 वर्षांतच मल्टीबॅगर परतावा देत आपल्या गुंतवणूकदारांना कोट्यधीश केले आहे...

शेअर बाजार म्हणजे अनिश्चिततेचा आणि जोखमीचा खेळ. मात्र, यात गुंतवणूक करणाऱ्याना, एखादवेळी, एखादा शेअर असा लागतो की, जो त्यांच्या नशीबाचा पेटाराच उघडतो. यांपैकी काही शेअर्स दीर्घ काळात मल्टीबॅगर परतावा देणारे असतात. तर काही कमी कालावधीतच आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल करतात. असाच एक शेअर आहे इंफ्रास्ट्रक्चर अँड रियल एस्टेट कंपनी 'हजूर मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेड'चा (Hazoor Multi Projects Share) यात शेअरमध्ये गुंतवणूक करणारे लोक केवळ 5 वर्षांतच कोट्यधीश बनले आहेत.

1 रुपये के शेयर का भाव 405 के पार हजूर मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेडच्या शेअरसंदर्भात बोलायचे झाल्यास, या इंफ्रास्ट्रक्चर स्टॉकने गेल्या केवळ 5 वर्षांतच मल्टीबॅगर परतावा देत आपल्या गुंतवणूकदारांना कोट्यधीश केले आहे. या शेअरमध्ये एप्रिल 2019 मध्ये केवळ 1 लाख रुपयांची गुतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना रक्कम आता 3.5 कोटींच्या जवळपास केली आहे. 

खरे तर, हजूर मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेडचा शेअर 12 एप्रिल 2019 रोजी केवळ 1.13 रुपयांवर होता. जो मंगळवारी 405.05 रुपयांवर पोहोचला आहे. या हिशेबाने 5 वर्षांच्या कालावधीत या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 35,745.13 टक्क्यांचा परतावा दिल आहे.

सात दिवसांपासून अप्पर सर्किट -हजूर मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेडचा शेअर मंगळवारी 9 एप्रिल 2024 ला शेअर बाजार बंद झाला तेव्हा 4.99 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह बंद झाला. या शेअरला गेल्या सात दिवसांपासून सातत्याने अप्पर सर्किट लागत आहे. या दरम्यान शेअरमध्ये जवळपास 40 टक्क्यांची तेजी आली आहे. गेल्या 28 मार्चला या शेअरची किंमत 288 रुपये होती.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकशेअर बाजार