Join us  

पैसे पुन्हा दुप्पट करण्याची संधी! बजाज हाउसिंग फायनान्स सारखा IPO येतोय; HDFC बँकेशी थेट कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 11:03 AM

Hdb Financial Ipo : HDFC बँकेच्या बोर्डाने त्यांची उपकंपनी HDB फायनान्शियल सर्व्हिसेसचा IPO मंजूर केला आहे. गुंतवणूकदारांना पुन्हा एकदा पैसे कमावण्याची संधी निर्माण झाली आहे.

Hdb Financial Ipo : मागच्या महिन्यात आलेल्या बजाज हाउसिंग फायनान्स आयपीओने गुंतवणूकदारांना मालामाल केलं. जर तुम्ही देखील IPO मध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला पैसे कमावण्याची चांगली संधी मिळणार आहे. देशातील सर्वात मोठी खाजगी बँक असलेल्या HDFC बँकेची उपकंपनी HDB Financial Services च्या IPO साठी मार्ग मोकळा झाला आहे. एचडीएफसी बँकेच्या संचालक मंडळाने HDB Financial ला IPO लाँच करण्यासाठी मान्यता दिली आहे. एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेसशी संबंधित १०,००० कोटी रुपयांच्या ऑफर फॉर सेल (OFS) सोबत १२,५०० कोटी रुपयांच्या शेअर्स विक्रीला मान्यता दिली आहे. एचडीएफसी बँकेने शनिवारी स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या फाइलिंगमध्ये या संदर्भात माहिती दिली आहे.

कंपनीत एचडीएफसी बँकेचा मोठा हिस्साप्रस्तावित IPO ची किंमत आणि इतर तपशील योग्य वेळी सक्षम संस्थेद्वारे निश्चित केले जातील. या आयपीओनंतर, HDB वित्तीय सेवा ही बँकेची उपकंपनी राहील. नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) HDB फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये HDFC बँकेचा ९४.६४ टक्के हिस्सा आहे.

१२,५०० कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्रीस्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, HDB आयपीओचा पूर्ण आकार १२,५०० कोटी रुपये असू शकतो. यामध्ये, १०,००० कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) द्वारे विकले जातील, तर कंपनी २,५०० कोटी रुपयांचे नवीन शेअर जारी करेल.

एचडीबी फायनान्शियलची माहितीएचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस ही एक नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी (NBFC) आहे. किरकोळ आणि व्यावसायिक क्षेत्रांना सेवा देते. यामध्ये वैयक्तिक कर्जे, वाहन कर्जाची विस्तृत श्रेणी आहे. HDB फायनान्शियल सर्व्हिसेसची स्थापना २००७ मध्ये झाली असून संपूर्ण भारतात १,६८० पेक्षा जास्त शाखा आहेत. या NBFC ने आर्थिक वर्ष २३ मध्ये तिच्या कर्जाच्या पुस्तकात १७ टक्के वार्षिक वाढ नोंदवली, जी ६६,००० कोटी रुपये होती.

याआधी बजाज ग्रुपची कंपनी बजाज हाउसिंग फायनान्सच्या आयपीओने गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला होता. ज्या गुंतवणूकदारांनी या इश्यूमध्ये पैसे गुंतवले आहेत, त्यांना लिस्टिंगच्या दिवशी १२५ टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे. गेल्या काही वर्षांत आयपीओबाबत गुंतवणूकदारांमध्ये क्रेझ वाढली आहे. 

(डिस्क्लेमर: IPO आणि शेअर्समधील गुंतवणूक ही बाजारातील जोखमींच्या अधीन आहे. यामध्ये आयपीओची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कुठलीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांटा सल्ला घ्या)

टॅग्स :एचडीएफसीइनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारशेअर बाजार