Lokmat Money >शेअर बाजार > शेअर बाजार आपटला; एका झटक्यात HDFC च्या गुंतवणूकदारांचे 100000 कोटी बुडाले...

शेअर बाजार आपटला; एका झटक्यात HDFC च्या गुंतवणूकदारांचे 100000 कोटी बुडाले...

HDFC Bank Share Fall : सेन्सेक्समध्ये 1628, तर निफ्टी 475 अंकांनी घसरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 04:57 PM2024-01-17T16:57:34+5:302024-01-17T16:58:14+5:30

HDFC Bank Share Fall : सेन्सेक्समध्ये 1628, तर निफ्टी 475 अंकांनी घसरला.

Share Market HDFC bank share Share market crashes; 100000 Crores of HDFC Bank lost in one stroke | शेअर बाजार आपटला; एका झटक्यात HDFC च्या गुंतवणूकदारांचे 100000 कोटी बुडाले...

शेअर बाजार आपटला; एका झटक्यात HDFC च्या गुंतवणूकदारांचे 100000 कोटी बुडाले...

HDFC Bank Share Fall : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी बुधवारचा दिवस अत्यंत वाईट ठरला. एकीकडे बीएसई सेन्सेक्स 1628 अंकांनी, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 475 अंकांनी घसरला. बाजारातील या भूकंपामुळे गुंतवणूकदारांचे 4 लाख कोटींहून अधिक रुपये बुडाले. देशातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक असलेल्या HDFC बँकेला सर्वात मोठा तोटा सहन करावा लागला. बँकेने तीन महिन्यांत कमावलेल्या रकमेपेक्षा पाचपट रक्कम एका झटक्यात बुडाली. 

सेन्सेक्स 1600 हून अधिक अंकांनी घसरला
मुंबई शेअर बाजाराचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स सकाळी 9.15 वाजता 71,988 च्या घसरणीसह उघडला. बाजार बंद होताना हा 1628.02 अंकांनी किंवा 2.23 टक्क्यांनी घसरुन 71,500.76 च्या पातळीवर बंद झाला. दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 460.35 अंकांच्या घसरणीसह 21,571.95 च्या पातळीवर बंद झाला. शेअर बाजारातील या मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना चार लाख कोटी रुपयांहून अधिकचा फटका बसला.

HDFC ला सर्वाधिक फटका
बाजारातील दिवसभरातील घसरणीचा सर्वाधिक फटका HDFC बँकेच्या गुंतवणूकदारांना बसला. कंपनीचे शेअर 8 टक्क्यांहून अधिक घसरले. ट्रेडिंगच्या शेवटच्या तासात एचडीएफसी बँक स्टॉकमध्ये मोठी घसरण नोंदवली गेली आणि बीएसईवर 8.57 टक्क्यांच्या मोठ्या घसरणीसह शेअर 1535 रुपयांच्या पातळीवर आला. या घसरणीमुळे बँकेच्या गुंतवणूकदारांना 100,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले.

मार्केट कॅप कमी झाले
मंगळवारी HDFC बँकेचे बाजार भांडवल 12,74,740.22 कोटी रुपये होते, परंतु बुधवारी हे 11.68 लाख कोटी रुपयांवर आले. त्यानुसार पाहिल्यास कंपनीचे मूल्य एका दिवसात 106740.22 कोटी रुपयांनी कमी झाले. एचडीएफसी बँकेशिवाय आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, कोटक बँक, एसबीआय आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली. 

(नोट- शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

Web Title: Share Market HDFC bank share Share market crashes; 100000 Crores of HDFC Bank lost in one stroke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.